एक्स्प्लोर

Anshuman Vichare: 'मराठी मातीत कमवून माज करायचा नाही..' मराठी अभिनेत्याची रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला..

रिक्षा, taxi चालकांच्या मराठी न स्वीकारता आंदोलन करण्याच्या प्रकारची त्याने चांगलीच खरडपट्टी काढलीय.

Anshuman Vichare: येत्या महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व परवानाधारक  रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आहे. (Marathi Mandatory For Auto Taxi Driver)  या निर्णयाविरोधात ऑटो-रिक्षा चालक मालक संघटनांचा रोष दिसून येत आहे. 4 मे पासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करणार  असल्याच्या संघटनांच्या पवित्र्यावर सर्व स्तरांतून प्रतिकिया उमटत आहेत.  कलाविश्वातूनही या संपावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नव्या नियमांनुसार मराठी भाषा न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.अनेक मराठी सेलिब्रिटींनी मात्र सरकारच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. विनोदी अभिनेता अंशुमन विचारे याने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. 'मराठी मातीत कमवून माज करायचा नाही… मराठी सगळ्यात आधी' असं तो म्हणालाय. रिक्षा, taxi चालकांच्या मराठी न स्वीकारता आंदोलन करण्याच्या प्रकारची त्याने चांगलीच खरडपट्टी काढलीय.

मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या तसेच भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात 15  लाख रिक्षा आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांचे कुटुंब उद्धवस्त होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांनी 4 मे पासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करणार आहेत.  

काय म्हणाला अंशुमन विचारे?

अभिनेता अंशुमन विचारे याने instagram वर स्टोरी टाकत या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला," मराठी मातीत कमावून माज करायचा नाही. मराठी सगळ्यात आधी" . असं तो म्हणालाय.

Anshuman Vichare: 'मराठी मातीत कमवून माज करायचा नाही..' मराठी अभिनेत्याची रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला..

हेमंत ढोमे, रितेश देशमुखची प्रतिक्रिया 

याआधी अभिनेता हेमंत ढोमे याने देखील सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सरकारचा समर्थन केलंय. पंधरा लाख म्हणजे मोठा आकडा आहे. 15 लाखांना मराठी नको असेल तर एक काम करा म्हणाव. जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथेच कमवा आणि खा महाराष्ट्रात मराठी बोला शिका प्रयत्न करा ..असं हेमंत ढोमे म्हणाला होता.  अभिनेता रितेश देशमुखनेही 'महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे' अशी भूमिका घेत सरकारच्या निर्णयाच स्वागत केलं होतं .

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget