मुंबई : मराठी सिनेसृष्टीमधील आणखी एक सेलिब्रिटी जोडपं लग्नबंधानात अडकले आहेत. अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा घाट घातला. कालच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शिवानी आणि अजिंक्यने त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंवर शेअर केले होते. त्यानंतर आज त्यांच्या लग्नाचे फोटो देखील समोर आले आहेत. गुलाबी रंगाला लेहंगा तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत असल्याचं पाहायला मिळतंय. 


शिवानी आणि अजिंक्यने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तसेच त्यांच्या या फोटोंना सोशल मीडियावर देखील अनेक लाईक्स आणि कमेंट्सने प्रेमाचा वर्षाव केला. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाच्या फोटोंमुळे देखील चाहत्यांना सुखद धक्का बसलाय. शिवानी आणि अजिंक्य यांच्या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मित्र मैत्रीणींनी देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. 



'अशी' आहे शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरी (Shivani Surve Ajinkya Nanaware Love Story)


शिवानी-अजिंक्यची पहिली भेट 'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या सेटवर हाय-हॅलो करण्यापर्यंतच शिवानी आणि अजिंक्यची मैत्री होती. मालिका संपल्यानंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. तसेच मैत्रीपलीकडे काहीतरी आहे, असं त्यांना वाटलं आणि ते पुन्हा एकमेकांना भेटू लागले. 2016 पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. शिवानी आणि अजिंक्यच्या लग्नाला सुरुवातीला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. 



अजिंक्य आणि शिवानीच्या कामांबद्दल जाणून घ्या


अजिंक्य हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिका आणि सिनेमांतही त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. दुसरीकडे देवयानी या मालिकेच्या माध्यमातून शिवानी घराघरांत पोहोचली आहे. नुकतेच तिचे 'वाळवी' आणि 'झिम्मा 2' हे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. आता शिवानी-अजिंक्यच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


ही बातमी वाचा : 


Shivani Surve Ajinkya Nanaware Engagement : शिवानी सुर्वे - अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज