Dhule News धुळे : राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Reservation) सर्वच मागण्या मान्य केल्याचे अध्यादेशाद्वारे जाहीर केला. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील ओबीसी (OBC) समाज बांधवांमधून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. राज्यभरात ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले असून गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आरक्षण बचावसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ओबीसी समाज बांधवांनी शासनाने काढलेला अध्यादेश फाडत निषेध व्यक्त करण्यात आला.


मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यांसह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. मराठा समाजाचे सर्वेक्षण करून ओबीसी कोट्यातून (OBC Reservation) त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधवांनी केली होती. 


धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने


त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंबंधीचा अध्यादेश काढल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांसाठी आज ओबीसी समाजाच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. 


हा अध्यादेश बेकायदेशीर


यावेळी ओबीसी समाज बांधवांनी राज्य सरकारने काढलेला मराठा समाज बांधवांसाठीचा अध्यादेश फाडत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा यावेळी ओबीसी समाज बांधवांनी दिल्या. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काढलेला अध्यादेश हा बेकायदेशीर असल्याचा आरोप यावेळी ओबीसी समाज बांधवांनी केला आहे. 


भुजबळांचा सरकारला टोला


झूंडशाहीच्या पुढे नमते घेतले जात आहेत. ते मराठा जातीसाठी लढत आहेत. मी तर संपूर्ण समाजासाठी लढतोय. मी सगळ्या ओबीसींसाठी लढतोय. त्यांनी सांगितल्यावर सगळे मंत्री, सचिव तयार होतील ताबडतोब जातील. जीआर सुद्धा काढतील असे म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सरकारला टोला लगावला. मात्र, आम्ही आमच्या कार्यक्रमानुसार जात आहोत. आम्ही तो आखला आहे. माझा अजेंडा फक्त ओबीसी बचाव असल्याचे भुजबळ म्हणाले.


आणखी वाचा


Uddhav Thackeray : "तुम्ही देव मानत असाल, तर माना, पण मोदींची तुलना छत्रपतींशी तुलना करणारे बिनडोक"; उद्धव ठाकरेंचा गोविंदगिरी महाराजांवर हल्लाबोल