एक्स्प्लोर

Governor trailer Out: मनोज वाजपेयींच्या ‘गव्हर्नर’च्या जबरदस्त ट्रेलरची प्रचंड चर्चा ; 2 मिनिट 54 सेकंदांचा थरार पाहून प्रेक्षक थक्क

संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आणि भारताला आर्थिकदृष्ट्या कोसळण्यापासून वाचवण्यासाठी जे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले, त्याभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते.

Governor Trailer Out: ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द केरळ स्टोरी 2’चे निर्माते आता आणखी एका सत्य घटनांवर आधारित कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. 1990 मध्ये भारतावर आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. अभिनेता मनोज बाजपेयी प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात भारताच्या इतिहासातील अत्यंत कठीण काळ दाखवण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये काय खास?

2 मिनिटे 54 सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवात 1990 च्या त्या काळापासून होते, जेव्हा भारत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. चित्रपटात मनोज बाजपेयी यांची भूमिका माजी RBI गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये देशाची ढासळणारी आर्थिक स्थिती, त्यातून जनतेमध्ये निर्माण झालेला संताप आणि रस्त्यावर माजलेला गोंधळ प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आणि भारताला आर्थिकदृष्ट्या कोसळण्यापासून वाचवण्यासाठी जे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले, त्याभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते.

ट्रेलरमध्ये चित्रपट सत्य घटनांपासून प्रेरित असल्याचं सांगण्यात आलं आहे. मनोज बाजपेयी यांचं पात्र देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतं. यासाठी देशातील सोने परदेशात पाठवण्याचा एक गुप्त प्लॅन तयार केला जात असल्याचंही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

मनोज बाजपेयींचा वेगळाच अंदाज

‘गव्हर्नर’मध्ये मनोज बाजपेयी अतिशय गंभीर आणि कठोर RBI गव्हर्नरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच ते अशा प्रकारच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर पाहता ती पत्रकाराच्या भूमिकेत असल्याचं समजतं. ट्रेलरमध्ये अनेक दमदार डायलॉग्सही ऐकायला मिळतात.

‘गव्हर्नर’ कधी रिलीज होणार?

दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा सुवेंदू भट्टाचार्य, सौरभ भारत, रवी असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी मिळून लिहिली आहे. चित्रपटातील गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली असून संगीत अमित त्रिवेदी यांनी दिलं आहे. ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट 12 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Akanksha Choudhary: 'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
'मला जबरदस्तीने गाडीत बसवलं अन्...' पुण्यातील नवरात्री इव्हेंटमध्ये मॉडेलसोबत भयंकर घडलं, VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
Obsession OTT Release: रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार
रिलीज होताच भारतात 99 कोटी कमावले; तरुणांना वेड लावणारा ‘ऑब्सेशन’ आता ओटीटीवर! या दिवशी हिंदीतही पाहता येणार
Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
Marathi Actress Second Marriage: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget