Mangesh Desai New Home : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी नुकतचं त्यांच्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश केला. तसेच माघी गणपतीनिमित्त त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे देखील आगमन झाले होते. त्यांच्या या नव्या घराचा व्हिडिओ मंगेश देसाई यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंवरुन शेअर केला आहे. त्यांच्या घरी गणपतीला कलाकरांसह अनेक राजकीय मंडळींनी देखील उपस्थिती दर्शवली होती. 


नाटक, सिनेमा, मालिका अशा सर्वच माध्यमांवर मंगेश देसाई यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या नव्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. मंगेश देसाई हे धर्मवीर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यांनी त्यांच्या घराचा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


असं आहे मंगेश देसाई यांचं नवं घर


सध्या मराठी कलाविश्वात अनेक कलाकार त्यांच्या हक्काचं घर घेत त्यांचं स्वप्न पूर्ण करत आहे. प्रसाद ओक, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, गिरिजा प्रभू यांच्या पाठोपाठ आता मंगेश देसाई यांनी देखील त्यांच्या नव्या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तसेच त्यांच्या या आलिशान घराची सफर देखील त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून करुन दिली आहे. त्यांच्या या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी म्हटलं की, घर, म्हणजे नुसतं विटांच काम नसते,घर, पहाटेच सुंदर स्वप्नं असते ,घर, नात्यांचे रेशीम बंध असते,घर, त्यात वास्तव्य करण्याचे अस्तित्व असते,आणि जेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेछयानी ते भरतं तेव्हा त्याला कोणाची दृष्ट लागू शकत नाही .






'मंगेश शलाका साहिल देसाई' अशी त्यांच्या घराची नेमप्लेट आहे.  शर्मिष्ठा राऊत, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर, प्रवीण तरडे, महेश लिमये यांसह अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे श्रीकांत शिंदे, संजय शिरसाठ, नरेश म्हस्के यांनी देखील हजेरी लावली होती. 


ही बातमी वाचा : 


Abhishek Bachchan : जेव्हा अभिषेकला राग अनावर होतो आणि तो थेट बहिणीचे केसच कापतो, श्वेता बच्चन यांनी सांगितला 'तो'किस्सा