Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या काही महिन्यांपासून बराच चर्चेत आहे. पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) सोबतच्या नात्यामुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे दोघेही बरेच चर्चेत होते. तर काही दिवसांपासून जया बच्चन (Jaya Bachchan ) या त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे. सध्या अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन (Shweta Bachchan) यांच्या नात्याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत. श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोन्ही भावंडांमध्ये खूप चांगलं नातं आहे. 


श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघेही जितकं एकमेकांवर प्रेम करतात तितकीच त्यांच्यामध्ये भांडणं देखील होतात. सध्या असाच अभिषेक आणि श्वेता बच्चन यांच्या एका भांडणाचा किस्सा चर्चेत आला आहे. त्यांच्यातील भांडणाचे असेच काही किस्से श्वेता बच्चनची मुलगी नव्या हीने What the hell Navya या पॉडकास्टमध्ये यासंदर्भात खुलासा केला आहे. तिने सांगितलेल्या या गोष्टीनंतर जया बच्चन यांना देखील हसू आवरले नाही. 


नेमका किस्सा काय?


श्वेताने यावेळी सांगितले की, जेव्हा माझं आणि अभिषेकचं भांडण व्हायचं तेव्हा आईबाबा दोघेही बाहेर गेलेले असायचे. असंच आमचं एकदा भांडणं झालं होतं. तेव्हा माहित नाही, अभिषेकला कुठून कात्री मिळाली, त्याने रागात माझे केस कापले होते. त्यानंतर मी तशीच शाळेत गेले. त्यानंतर आई माझे केस रोज व्यवस्थित विंचरायची जेणेकरुन माझे कापलेले केस दिसणार नाही. या पॉडकास्टमध्ये नव्याने म्हटलं की, अमिताभ यांना बच्चन कुटुंबातील कोणत्याही स्रीचे केस छोटे असलेलं आवडत नाही. त्यांना मोठे केस आवडतात. 


जया बच्चन यांच्या संपत्तीची चर्चा 


जया बच्चन यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये एकूण 1001 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं आहे. तसेच जया बच्चन यांच्या 105.64 कोटी रुपये थकबाकी असल्याचं म्हटलं. हे पत्र त्यांनी 2018 मध्ये दाखल केले होते. जया बच्चन यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रामध्ये 9 लाख रुपयांचे पेन आणि 51 लाख रुपयांची घड्याळं असल्याचंही सांगितलं आहे. अमिताभ यांच्याकडे 3.4 कोटी रुपयांची घड्याळं आहेत. जया बच्चन या राज्यासभेवर पाचव्यांदा खासदार म्हणून जाणार आहेत. दरम्यान त्यांनी शपथपत्रात नमूद केलेल्या त्यांच्या संपत्तीनंतर सध्या त्यांच्या संपत्तीची चर्चा सगळीकडे सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. 


ही बातमी वाचा : 


Lakshmichya Pavalani : चांदेकरांच्या घरात कलाला भोगावी लागणार नयनाच्या वागण्याची शिक्षा, लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा महाएपिसोड