एक्स्प्लोर

Mangala Bansode : कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल

Mangala Bansode : महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी उपस्थित केला आहे.

Mangala Bansode On Gautami Patil : प्रसिद्धीच्या झोतात आलेली नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एका कार्यक्रमात चेंजिंग रुममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. ही अत्यंत लाजिरवाणी घटना असून यावरुन सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिला कलावंताचा असा व्हिडीओ काढून तो व्हायरल करणं निंदनीय आहे. महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर (Mangala Bansode) यांनी उपस्थित केला आहे.

मंगला बनसोडे काय म्हणाल्या?

मंगला बनसोडे म्हणाल्या की, "गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे." अशा महाराष्ट्रात एका स्त्रीची, महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते? असा सवाल मंगला बनसोडे यांनी उपस्थित केला आहे. 

मंगला बनसोडे पुढे म्हणाल्या की, "गौतमी पाटील एक स्त्री आहे आणि नंतर कलावंत आहे. त्यामुळे तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणं चुकीचं आहे. गौतमी कलावंत असली आणि तिच्या हातून चुका झाल्या असल्या तरी तिने याबद्दल माफी मागितली आहे. परंतु आता स्त्रीजातीची विटंबना होत असल्यामुळे खूप वाईट वाटत आहे. अशापद्धतीची विटंबना पुन्हा करु नये अशी माझी विनंती आहे. मीदेखील एक कलावंत आहे, स्त्री आहे. त्यामुळे माझ्या विनंतीला मान द्या आणि तो व्हिडीओ व्हायरल करणं बंद करा". 

रुपाली चाकणकरांनी घेतली दखल 

मंगला बनसोडे यांच्याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीदेखील गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओची दखल घेतली होती. रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केलं होतं की, "लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडीओ समाज माध्यमांवरुन प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे". 

संबंधित बातम्या

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर यांची ट्वीटद्वारे माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Joshi Deool Band 2: 100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
August Upcoming Movies: एकाच महिन्यात 7 बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफिस क्लॅश! सनी देओल श्रद्धा कपूरसह मोठमोठे सेलिब्रिटींची टक्कर; कोण मारणार मैदान?
एकाच महिन्यात 7 बिग बजेट चित्रपटांचा बॉक्स ऑफिस क्लॅश! सनी देओल श्रद्धा कपूरसह मोठमोठे सेलिब्रिटींची टक्कर; कोण मारणार मैदान?
'छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट
'छातीत धस्स झालं, बाईंचा आवाज कानात घुमायला लागला अन्.. सुकन्या मोने यांची विजया मेहता यांच्या आठवणीत भावनिक पोस्ट

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget