मुंबई : खूप कमी नटांच्या नशिबात असं भाग्य असतं की समाजातल्या अत्यंत आदर्शवत व्यक्तींची भूमिका त्यांना पडद्यावर जगता येते, अनुभवता येते, साकरता येते. संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) आणि राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) त्या अत्यंत मोजक्या नशीबवान अभिनेत्यांपैकीच एक आहेत. सत्यशोधक (Satyashodhak) चित्रपटामध्ये संदीप देशपांडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले तर राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या चित्रपटाविषयीचे अनेक किस्से त्यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) सांगितले. 


मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी ज्योतिबा फुले यांच्यासारखा दिसेन. पण आमच्या चित्रपटाचे लेखक संदीप जळमकर यांनी मला फुलेंचा आणि माझा फोटो मॉर्फ करुन दाखवला की तु अगदी सारखा दिसतो. तेव्हा मला कळालं की नाही ही भूमिका आपण साकारायला हवी, असं संदीप कुलकर्णी यांनी माझा कट्ट्यावर सांगितलं. सत्यशोधक या चित्रपटात संदीप कुलकर्णी यांनी ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली आहे. 


सात वर्षापूर्वी सत्यशोधकचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी गावातच काम करत होते. त्यावेळी संदीपचा फोन आला आणि या चित्रपटाविषयी सांगितलं. माझ्यासाठी सावित्रीबाई फुले यांचं पात्र साकारणं खरंच खूप अभिमानाची गोष्ट होती. कारण मी खेडेगावत काम करते तिथल्या गोष्टी मी जाणल्या आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हे खूप आव्हानात्मक होतं, असं राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या भूमिकेविषयी सांगितलं. 


सावित्रीबाई फुले यांची भूमिका कोण साकारणार याच्यावर जेव्हा चर्चा सुरु होती. तेव्हा आम्ही अनेक गोष्टींचा विचार केला. पण सावित्रीबाईंची भूमिका कोण साकारणार यावर अनेक संभ्रम होते. त्याआधी आम्ही सुरुवात देखील केली होती. त्यानंतर मला राजश्रीला या भूमिकेविषयी विचारल्याचं संदीप कुलकर्णी यांनी म्हटलं. 


ज्योतिबा फुले नव्याने कळले - संदीप कुलकर्णी


जेव्हा आम्ही या चित्रपटासाठी काम करायला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला कळलं की महात्मा फुले ही व्यक्ती किती मोठी आहे. तशाच खूप काही गोष्टी आहेत. ज्योतिबा फुले हे त्याकाळात सर्वात मोठे उद्योजक होते, ही गोष्ट मलाच माहिती नव्हती. ही गोष्ट आम्हाला कळली. आपल्याला फक्त ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षण सुरु केलं इतकच माहिती होतं, पण त्यांनी ते का सुरु केलं, लोकं त्यांना का सत्यशोधक म्हणतात, हे नव्यानं कळलं.  


हेही वाचा : 


Madhuri Dixit : पाच मृत्यूचा समज, अंधश्रद्धेचे 'पंचक' सोडवणार, माधुरी दीक्षितच्या सिनेमाची स्टोरी काय?