Australia vs Pakistan : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला मागे टाकले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी विजयानंतर टीम इंडियाने अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, क्लीन स्वीप करत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मागे टाकले. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. 29 वर्षांनंतरही पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. 1995 मध्ये त्यांनी येथे शेवटचा विजय मिळवला होता.


ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि या कालावधीत 5 सामने जिंकले आहेत. त्याला 2 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. विजयाची टक्केवारी 56.25 इतकी आहे. कांगारू संघाचे 54 गुण आहेत. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 54.16 आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 2 टक्के कमी आहे. या कालावधीत भारताने 4 सामने खेळले असून 2 सामने जिंकले आहेत. एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2 सामने खेळले आहेत. या कालावधीत एक सामना जिंकला असून एक सामना हरला आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 50 आहे. न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे आणि एक पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेश सध्या पाचव्या स्थानावर आहे.


भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण दुसरा सामना भारताने जिंकला होता. या विजयासह तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. पण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध क्लीन स्वीप करून भारताला मागे सोडले. आता टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या