Majha Katta : आपल्या पुरणांनी 64 कला सांगितल्या, पण आता जाहिरात ही 65 वी कला झाली आहे. जाहिरा (Advertisement) ही आता एक केवळ कला नाही राहिली तर ते शास्त्रही झालंय. कला शास्त्र यांची सांगड घालत क्रिएटिव्ह जाहिराती करणाऱ्या भरत दाभोळकर (Bharat Dabholkar) यांनी जाहिरात क्षेत्रातले बरेच रंजक किस्से माझा कट्टावर (Majha Katta) सांगितले. सर्वसामान्य लोकांच्या मनामनात आणि भारतीयांच्या घराघरात अमूल गर्ल पोहचवण्याचं श्रेय हे दाभोळकर सरांचं आहे. त्यांनी या अमूल गर्लविषयी देखील भाष्य केलं आहे. 


मला लहानपणी आपीएस ऑफीसवर होण्याची इच्छा होती. पण त्यानंतर मी वकिलीचं शिक्षण घेतलं,  माझं शालेय शिक्षण गिरगावांतील मराठी शाळेत झालं. त्यानंतर मी एलफिस्टन महाविद्यालयात अॅडमिशन घेतलं. तेव्हा माझ्या वर्गामध्ये 145 मुली होत्या आणि 5 मुलं होतं. त्यावेळी वर्गातल्या मुलींबरोबर मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. तेव्हा मी माझ्या इंग्रजीवर काम करायचं ठरवलं, असं भरत दाभोळकर यांनी माझा कट्टावर सांगितलं. 


माझ्या ऑफीसची रचना तेव्हा खतरनाक होती. माझ्या ऑफीसमध्ये बरेच प्राणी होते. त्यांना पाहूनच येणारा क्लाइंट हा जाहीरातीवर जास्त प्रश्न करायचा नाही, असा एक मिश्किल अनुभव भरत दाभोळकर यांनी शेअर केला. अमूलची जाहिरात करताना आम्हाला सांगितलं की तुम्ही काय करणार आम्ही विचारणार नाही, पण जे काही कराल ते चांगलं करा, त्यामुळे ते चांगलं व्हायचं, असा अनुभव भरत दाभोळकर यांनी सांगितला. 


अशा प्रकारे अमूल गर्ल पोहचली घराघरात


मी सुरुवातीला 10 ठिकाणी जाहिरातींच्या कंपनीमध्ये अप्लाय केलं. जी कंपनी अमूलची जाहिरात करायची त्या कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली. तेव्हा मी बसून जाहिराती लिहायचो. त्यानंतर ते पुढे वाढत गेलो. अमूलच्या मुलीला मी भारतीय करण्याचं काम केलं. तिला आम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यामुळे ती पुढे घराघरात पोहचली. त्यानंतर मी अनेक जाहिराती केल्या, असं म्हणत भरत दाभोळकर यांनी अमूल गर्ल विषयी भाष्य केलं. 


भरत दाभोळकरांनी शेअर केला पुलं सोबतचा किस्सा


माझं पहिलं नाटक तुझं आहे तुझं पाशी हे नाटक लिहिलं. त्याचा ढाचा मी तसाच ठेवला. तेव्हा मी अनेक निर्मात्यांशी बोललो, पण कोणीही तेव्हा तयार नव्हतं. त्यावेळी मी पु.लं देशपांडे यांना पत्र पाठवलं. त्यांनी मला तेव्हा सांगितलं की इंग्रजीमध्ये हे नाटक करु नको, कारण आतापर्यंत अनेकांनी हे नाट केलं आहे, हिंदी, गुजराती पण मराठीमधला तो टच या नाटकामध्ये आला नाही. त्यामुळे तू इंग्रजी नाटक करु नकोस. तेव्हा मी पुन्हा त्यांना पत्र पाठवलं की मी हे नाटक लिहिलंय, त्याची एक प्रत तुम्हाला पाठवतो, तुम्ही वाचून बघा. तेव्हा पु.लं देशपांडे यांनी मला पत्र लिहून सांगितलं की एकही शब्द न बदलता हे नाटक तसंच कर. 


बाळासाहेबांनी थोपटली पाठ


गणपतीत आम्ही चौपाटीला एक हॉर्डींग लावलं होतं. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेत आम्हाला ते काढायला लावलं. जर काढलं नाही, तर ते आम्ही जाळून टाकू असं आम्हाला सांगण्यात आलं. तेव्हा मी अमूलच्या ऑफिसमध्ये सांगितलं की आपण कोणाशी तरी बोलून घेऊ. तेव्हा मी अनेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीर जोशी अशी बरीच लोकं होती. त्यानंतर शेवटी बाळसाहेबांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की 10 वाजता शिवसेना भवनावर भेटायला ये. मी गेलो त्यांना दाखवलं की असं असं लिहिलं आहे. ते मला म्हणाले हे तू लिहिलंस म्हटलं हो, त्यांनी मला म्हटलं छान वाटलं मला मराठी माणूस असं काहीतरी करतोय. मी त्यांना म्हटलं की, पण हे पोस्टर आम्हाला काढायला लावलंय. त्यांनी मला विचारलं कोणी शाखाप्रमुखाने सांगितलं का, मी त्याला सांगतो, उद्यापासून तुला सुरक्षा द्यायला, असं म्हणत त्यांनी माझी पाठ थोपटली, असं भरत दाभोळकरांनी सांगितलं. 


ही बातमी वाचा : 


Amruta Fadanvis and Rihanna : राधिका-अनंतच्या प्री वेडिंगमध्ये रिहाना अन् अमृता फडणवीस एकत्र, #inspiration कॅप्शन देत केला फोटो शेअर