Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभेच्या (Lok Sbha Elections 2024) पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नावांची पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पहिली यादी भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे गांधीनगर येथून निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान मिळाले नाही.
गुरुवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बरीच चर्चा झाली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठकीत 150 ते 200 उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
'या' राज्यातील उमेदवारांची नावे जाहीर
उत्तर प्रदेश 51, प. बंगाल 27, मध्य प्रदेश 24, गुजरात 15, राजस्थान 15, केरळ 12, तेलंगणा 9, आसाम 11, झारखंड 11, छत्तीसगड 11, दिल्ली 5, जम्मू काश्मीर 2, उत्तराखंड 3, अरुणाचल प्रदेश 2, गोवा 1 अशी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या उमेदवारांची नावे घोषित
वाराणसी - नरेंद्र मोदी
अंदमान निकोबार - विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम - किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व - तपिर गावो
सिलचर - परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी - बिजुली कलिता
तेजपुर - रणजित दत्ता
नौगाव - सुरेश बोरा
दिबृगड - सर्वानंद सोनोवाल
विलापसुर - तोखन साहू
राजनंदगाव - संतोष पांडे
रायपूर - ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर - महेश कश्यप
दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल
चांदनी चौक - प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली - मनोज तिवारी
बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली - रामविर सिंग बिधुडी
उत्तर गोवा - श्रीपाद नाईक
गांधीनगर - अमित शाह
राजकोट - पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर - मनसुख मांडवीय
नौसारी - सी. आर पाटील
जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग
कोडरमाल - अन्नपूर्णा देवी
हजारीबाग - मनीष जैस्वाल
कासरगोड - एम एल अश्विनी
कन्नूर - प्रफुल्ल कृष्ण
कोझिकोडे - एम टी रमेश
त्रिशुर - सुरेश गोपी
अल्पुझा - शोभा सुरेंद्र
अटींगल - वी मुरलीधरन
गुना - ज्योतिरादित्य सिंधिया
भोपाल - देवल शर्मा
बिकानेर - अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री)
अलवर - भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री)
भरतपूर-रामस्वरुप कोहली
जोधपूर - गजेंद्र सिंह शेखावत
चित्तोडगड - सी पी जोशी
कोटा- ओम बिर्ला
करीमनगर-बंडी संजयकुमार
निझामाबाद - अरविंद धर्मापूरी
त्रिपुरा - विप्लव कुमार देव
नैनिताल - अजय भट ( केंद्रीय मंत्री)
गौतम बुद्धनगर - डॉ महेश शर्मा
बुलंद शहर - भोला सिंह
मथुरा - हेमा मालिनी
एटा - राजू भैय्या
खिरी - अजय मिश्रा टेनी
उनाव - साक्षी महाराज
लखनऊ - राजनाथ सिंह
अमेठी - स्मृती इराणी
कनौज - सुब्रत पाठक
गोरखपूर - रवी किशन
पासगाव - कमेलश पासवान
जौनपुर - कृपा शंकर सिंह
कुंजबिहार - निशिथ प्रामाणिक
मुर्शिदाबाद - गौरी शंकर घोष
आणखी वाचा