Mahesh Manjarekar : मराठी सिनेमे चालत नाहीत, ही व्यथा कलाकारांकडून अनेक वर्षांपासून मांडली जातेय. अनेक आशयघन, विषयाची सखोल मांडणी करणारे सिनेमे मराठी येतातही. पण तरीही प्रेक्षक मराठी सिनेमांकडे बऱ्याचदा पाठ फिरवत असल्याचंही चित्र बऱ्याचदा पाहायला मिळतं. अनेक सिनेमे सिनेमागृहात हाऊसफुल्लच्या बोर्डात येतातही, पण त्यांचं सिनेमागृहातं वास्तव्य हे काही आठवड्यांचंच असतं. यामध्ये सिनेमा, प्रेक्षक आणि कलाकार यामध्ये कोण कमी पडतं, हा प्रश्न अनुत्तरितच राहिल. पण आता मराठी सिनेमा लोकांनाच पाहायचा नाही, असं मत दिग्दर्शक महेश मांजेरकर (Mahesh Manjarekar) यांनी केलं आहे. 


महेश मांजरेकर यांनी अनेक विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांसमोर ठेवले आहेत. काकस्पर्श, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, नटसम्राट, जुनं फर्निचर यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. त्यांचे हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडले. त्याचप्रमाणे या सिनेमांचा विषयी प्रेक्षकांना भावला. पण आजही मराठी सिनेमांना थिएटर्समधलं वास्तव्य दिर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचंही मत मांजरेकरांनी व्यक्त केलं आहे. 


'लोकांना मराठी सिनेमे पाहायचे नाही'


पुढारी न्यूजच्या महासमिटमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी याविषयी भाष्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'लोकांना माहितेय, मराठी सिनेमा येतोय पण त्यांना तो बघायचा नाहीये. ज्या प्रमाणात इतर भाषेतले सिनेमे बघितले जातात, त्या प्रमाणात त्यांना मराठी सिनेमे बघायचे नाहीयेत. हल्ली तमिळ तेलुगु सिनेमे लागतात, त्याचेही नंबर्स मराठी सिनेमापेक्षा जास्त असतात. आता तर सोशल मीडियामुळे लोकांना माहित असतात, की मराठी सिनेमे येतायत, पण त्यातले किती मराठी लोकांना बघयाचे असतात. त्यामुळे एक मानसिकता तयार झाली आहे. लोकांना नाही पाहायचे मराठी सिनेमे. आज मराठी सिनेमांची स्थिती फार चांगली नाहीये. 


कंटेटच्या बाबतीत बोंबच - महेश मांजरेकर


पुढे त्यांनी म्हटलं की, साधारण वर्षाला 80 ते 90 मराठी सिनेमे येतात. मराठीमध्ये खूप चांगल्या कलाकृती पाहायला मिळतात. त्यांच्या बजेटमध्ये कंटेट म्हणून मराठी खूप चांगला कंटेटही देतं. पण ते अॅवरेज बघायला गेलं तर, एक सात ते आठ सिनेमे सोडले तर बाकीच्या सिनेमांची कंटेटच्या बाबतीत बोंबच आहे.तसं मल्याळमध्ये नाही. आपले सिनेमे चार आणि पाच कोटीमध्ये तयार होतात. सहा कोटी म्हणजे आपल्यासाठी बिग बजेट असतो.एका थिएटरच्या एका ऑडीमध्ये आपला तीन कोटीचा सिनेमा सुरु असतो, बाजूच्या ऑडीमध्ये साऊथचा डब 400 कोटीचा सिनेमा सुरु असतो. या सगळ्याशी कशी फाईट करायची? 


ही बातमी वाचा : 


Deepika Padukone-Ranveer Singh :'या' दिवशी होणार दीपिका-रणवीरच्या चिमुकल्याचं आगमन? बर्थ डेटविषयी महत्त्वाची माहिती समोर