Shivaji Maharaj Statue, मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण मधील राजकोट किल्ल्यावर 26 ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्या प्रकरणी सिंधुदुर्गातील मालवण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक आरोपी पकडला तर एक फरार आहे. त्यातील आरोपी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला आज मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले असून सुनावणी झाली. चेतन पाटील यांचे वकील तुषार शिंदे यांनी काम पाहिले तर सरकारी वकील म्हणून तुषार भंडगे यांनी काम पाहिले. व्यायालयायने चेतन पाटील यांना नाव सांगा असं सांगितलं. तसेच पोलिसांनी मारहाण केली का याची विचारणा केली, यावर त्यांनी मारहाण केली नाही असं सांगितलं. 


आरोपी सोबत आणखी कोण आहे, आर्थिक देवाण घेवाण झाली का? याचा तपास करायचा आहे - पोलीस 


पोलिसांनी चेतन पाटील यांनी कसे काम केले याचा पुरावा गोळा करायचा आहे. तसेच अन्य कोण व्यक्ती होत्या का याची तपासणी करायची आहे. तसेच पुतळा पडला इथे पर्यटकांचा जीव गेला असता. बांधकाम कसे केले पर्यावरणाचा अभ्यास केला का? या कामी माहिती घ्यायची आहे. तसेच आरोपी उच्चशिक्षित आहे. आरोपी सोबत आणखी कोण आहे. आर्थिक देवाण घेवाण झाली का? तसेच आरोपी कडून लॅपटॉप जप्त करायचा आहे. याचा तपास करण्यासाठी 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली. यात रजिस्टर निविदा मिळते. एकूण दोन आरोपी असून एक आरोपी फरार आहे. तसेच 2 दिवसांपासून राडे सुरू आहेत, त्याचा सखोल तपास करायचा आहे. हे आरोपी आहेत, असंही पोलीसांनी न्यायालयात सांगितलं. 


चेतन पाटील यांचा पुतळा पडावा असा हेतू नव्हता, वकिलांनी मांडली बाजू 


यावर आरोपीच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. चेतन पाटील यांची अटक चुकीची आहे. पुतळा का पाडला याचे कारण पोलिसांकडे नाही. फक्त असं झाले असते म्हणून यावर गुन्हा केला. पोलिसांकडे कुठला पुरावा नाही. खोट्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला. चबुतरा पूर्णपणे ठीक आहे, मग चेतन पाटील यांचं चबुतरा बांधणे  एवढेच काम होतं, तो चबुतरा नीट आहे. 307 गुन्हा का दाखल केला. चेतन पाटील यांचा पुतळा पडावा असा हेतू नव्हता. त्यांची वर्क ऑर्डर नाही आहे. प्रशोभक अर्थात जनभावना कमी करण्यासाठी चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पुतळा का पडला याचे उत्तर शोधावे. यासाठी कुठल्या एक्स्पर्टचा अहवाल नाही. सळ्या, धातू गंजले होते का?. सर्व कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. सार्वजनिक मालमततेचे नुकसान कसे झाले याचा कारण स्पष्ट नाही. IPC कलमांची थटा केली जातेय. फक्त मेल केला की झालं,  बाकी काही नाही. गुन्हाच हे बसते का? 20 ऑगस्ट रोजी लोकांकडून माहिती देण्यात आली होती. यात संगमत कसे काय. पोलिस कोठडीची काही गरज नाही. बोगस केसेस दाखल करण्यात आल्या.  यावर सरकारी वकील बाजू मांडत आहेत. दुसरा आरोपी अजून भेटला नाही. त्यामुळे पोलिस कोठडी मिळावी. त्यामुळे 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या 


BJP : राष्ट्रवादीमुळे भाजपाचं वाटोळं झालं, राष्ट्रवादीशी युती का केली हे कळायला मार्ग नाही; भाजप जिल्हाध्यक्षाचा पक्षाला घरचा आहेर