(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahesh Babu : आलिशान बंगला अन् लग्झरी कार; जाणून घ्या महेश बाबूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत
महेश बाबूकडे (Mahesh Babu) किती संपत्ती आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल.
Mahesh Babu Net Worth : दाक्षिणात्य सुपर स्टार महेश बाबू (Mahesh Babu Net Worth) याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. महेश बाबूकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला असेल. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
महेश बाबू हा अभिनयासोबतच दिग्दर्शन देखील करतो. त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चाइल्ड अॅक्टर म्हणून काम करण्यास सुरूवात केली होती. महेश बाबूचे हैद्राबाद येथील जुबली हिल्स येथे आलिशान घर आहे. त्याच्या या घराची किंमत जवळपास 28 ते 30 कोटी रूपये आहे.
महेश बाबूकडे वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंज आणि ऑडी यांसारख्या लग्झरी कार्स आहेत. रिपोर्टनुसार, महेश बाबू हा 150 कोटी रूपये एवढ्या संपत्तीचा मालक आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Samantha : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबाबतची पोस्ट समंथाकडून डिलीट; दोघं पुन्हा एकत्र येणार?
The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेल्यानं शैलेश लोढा ट्रोल; नेटकरी म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha