Mahesh Babu : गेल्या काही दिवसांपासून महेश बाबू (Mahesh Babu) हा त्यानं केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. यावेळी महेश बाबूनं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबत सांगितलं होतं. 'बॉलिवूडला मी परवडत नाही', असं तो म्हणाला होता. आता त्याच्या या वक्तव्यानंतर अनेक नेटकरी सध्या  पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबूला ट्रोल करत आहेत. 


गेल्या वर्षी, महेश बाबूनं एका पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम केलं. या जाहिरातीमध्ये महेश बाबूसोबतच  टायगर श्रॉफनं देखील काम केले. आता या जाहिरातीमुळे अनेक नेटकरी महेश बाबूला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, 'बॉलिवूडला महेश बाबू परवडत नाही पण पान मसाल्याच्या जाहिरातीला तो परवडू शकतो.  '




दुसऱ्या नेटकऱ्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'मला वाटतं महेश बाबूसारखे अभिनेते पान मसाल्याची जाहिरात करु शकतात.  इतर लोकांनी केली तर त्यांना ट्रोल केले जाते. ' या पोस्टसोबतच या नेटकऱ्यानं महेश बाबूच्या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 




महेश बाबूचं वक्तव्य 
सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. केजीएफ-2, आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याबाबत मेजर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये महेश बाबूनं बॉलिवूडबाबत वक्तव्य केलं होतं. 'मला बॉलिवूडमधून खूप ऑफर्स आल्या. बॉलिवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही. तेलगू चित्रपटांमुळेच मला स्टारडम आणि लोकांचं प्रेम मिळालं. '


पुढे महेश बाबू म्हणाला होता, 'माझा उद्देश  पॅन इंडिया स्टार व्हायचा नाहीये. मला दाक्षिणात्य चित्रपटांना देशभरात यश मिळवून द्यायचंय. मला आधी पासूनच तेलगू चित्रपटांमध्ये काम करायचे होते आणि माझी इच्छा होती की भारतातील सर्व लोकांनी हे चित्रपट बघावेत. 


सुनील शेट्टीनं दिलं उत्तर 


महेश बाबूच्या वक्तव्याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारल्यावर सुनील शेट्टीनं त्याचं मत मांडलं होतं. तो म्हणाला होता, 'कोणता चित्रपट पाहावा आणि कोणता पाहू नये हा निर्णय प्रेक्षक घेत आहेत.  आपली समस्या ही आहे की आम्ही प्रेक्षकांना विसरलो आहोत. सिनेमा असो किंवा ओटीटी, बाप हा बापच राहणार, कुटुंबातील बाकीचे सदस्य कुटुंबातीलच राहणार. बॉलीवूड नेहमीच बॉलीवूड राहील. आपण विचार केला पाहिजे, कारण आजच्या काळात  कंटेंट हाच राजा आहे हे सत्य आहे.'


हेही वाचा :