IIFA 2022 Postponed : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) द इंटरनेशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA)चा  या वर्षीचा पुरस्कार सोहळा पार पडणार होता.  पण आता या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आयफानं घेतला आहे. हा निर्णय  यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan)  यांच्या निधनानंतर आयफा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी घेतला. शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्या निधनानंतर 40 दिवस यूएईमध्ये शोक व्यक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आयफानं पुरस्कार सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 


आयफाचा पुरस्कार सोहळा 19 ते 22 मे दरम्यान अबू धाबी येथील एका आयलँडवर पार पडणार होता. आता हा सोहळा 14 जुलै  2022 ते 16 जुलै 2022 दरम्यान पार पडणार आहे. याबाबत आयफा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी एका पोस्टमधून माहिती दिली आहे.  या पोस्टमधून त्यांनी शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांना श्रद्धांजली वाहिली. 


आयफा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरस्कार सोहळ्याशी संबंधित इतर  माहिती लवकरच शेअर केल्या जातील. IIFA ने तिकीट खरेदीदार आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे की भारत-UAE मैत्रीचा हा उत्सव नंतर साजरा केला जाईल. 


आयफा हा हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध पुरस्कार आहे. गेली कित्येक वर्ष जगातील विविध शहरांमध्ये हा सोहळा आयोजित केला जात आहे. तसेच बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमधील देखील सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहतात. तसेच या सोहळ्यामधील कलाकारांच्या रेड कार्पेट लूकची चर्चा सोशल मीडियावर होत असते. या सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स देखील करतात.  






संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांचे  13 मे रोजी  निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. यूएईच्या मिनिस्ट्री ऑफ प्रेसिडेंन्शिअर अफेअर्सने आज अध्यक्ष शेख खलिफांच्या मृत्यूची बातमी जाहीर केली आहे. 


हेही वाचा :