एक्स्प्लोर

Corona Awareness :लोककलेतून होणार कोरोना जागृती, राज्य सरकारचा निर्णय, पाच कोटींच्या निधीची तरतूद

लोककलावंतांकडे असलेल्या कलेचा उपयोग कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी होणार आहे. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. या नव्या योजनेसाठी राज्य सरकारने पाच कोटीच्या निधीची तरतूद केली आहे.  

मुंबई : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा लोककलावंतांचा प्रश्न समोर आला आहे. एकीकडे पहिल्या लाटेनंतर सगळं नव्याने सुरू होता होता गोष्टी थांबल्याने लोककलावंतांसमोर मोठी अडचण उद्भवली आहे. आता याच अडचणीवर राज्य सरकारने उपाय शोधून काढला आहे. लोककलावंतांकडे असलेल्या कलेचा उपयोग कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी होणार आहे. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. या नव्या योजनेसाठी राज्य सरकारने पाच कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.  

लोककलेनं नेहमीच लोकरंजनासोबत जागृतीचं काम केलं. अनिष्ट प्रथांविरोधात लोककलेतून आसूड ओढण्यात आला. आता हीच लोककला कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, माहीती व जनसंपर्क आदींनी मिळून विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत. या बैठकीला अभिनेता सुबोध भावेही उपस्थित होता.

सुबोध एबीपी माझाशी बोलताना म्हणाला, 'लोककलावंतासमोर आता चरितार्थासाठी मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर विचार करताना या लोककलावंतांचा वापर जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये, वाड्यांमध्ये कोरोना जागृतीसाठी करता येईल यावर एकमत झालं. त्यानुसार एकल कलावंत जे आहेत ते हे काम करतील. गावातल्या चावडीपाशी.. किंवा वाडीतल्या चौकात जाऊन हा कलाकार आपली कला सादर करेल.  त्या कलेतून तो कोरोनाशी लढताना घ्याव्या लागणाऱ्या काळजीबद्दल सांगेल. त्याच्यासोबत प्रशासनाचा एक माणूसही असेल. त्याच्या अटी-नियम जीआरमध्ये दिलेल्या आहेत. दुपारी 4 ते 6 या वेळेतच तो ही आपली कला सादर करेल. अशा एकल कलावंतांची यादी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे आहे. ती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली जाईल. त्यानंतर त्या त्या एकल कलावंतांनी दिलेला विषय घेऊन सादरीकरण करायचं आहे.'

जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सतत मास्क लावणे, तो योग्य पद्धतीने लावणे, हात धुणे, सॅनिटायझर लावणे, अंतर राखणे.. आदी अनेक विषय यात घेण्यात आले आहेत. वृद्धांनी, लहान मुलांनी घ्यायची काळजी, सरकारची कोरोनाविषयक असलेली नियमावली आदीं विषय घेता येणार आहेत. त्या त्या गावचा ग्रामसेवक, शाळेचा मुख्याध्यापक हा त्या एकल कलावंतांसोबत असेल. कार्यक्रम झाल्यावर तो अधिकारी संबंधित कलाकाराला प्रमाणपत्र देईल. त्या प्रमाणपत्राच्या आधारे कलाकाराला मानधनाची मागणी करता येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
CID Director Death: 'CID' अन् 'आहट'चे दिग्दर्शक बी.पी सिंह यांचं निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास, चाहते हळहळले
'CID' अन् 'आहट'चे दिग्दर्शक बी.पी सिंह यांचं निधन; हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास, चाहते हळहळले
Sayaji Shinde Son Debut Movie: सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
सयाजी शिंदेंच्या लेकाला पाहिलंत का? लवकरच बाप - लेकाची जोडी रुपरी पडद्यावर झळकणार, कधी होणार रिलीज?
Shraddha Kapoors Eetha: प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर
प्रतिक्षा संपली! श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट, कधी होणार ट्रेलर रिलीज? तारीख समोर

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
Embed widget