एक्स्प्लोर

चाहत्यांना सरप्राईज! लग्नानंतर हास्यजत्रेत परतणार हा विनोदवीर, काही महिन्यांचा घेतलेला ब्रेक, गौरव की अजून कोणी?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या कलाकाराने आपल्या भन्नाट कॉमेडीने खास स्थान निर्माण केलं होतं.

Maharashtrachi Hasyajatra Actor Comeback:'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोची, या शोमधील स्पर्धकांची सध्या एकच चर्चा आहे. हास्यजत्रेतील कलाकार गौरव मोरेच्या लग्नाची आणि त्याच्या नव्या घराची मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा आहे. अनेक हास्यजत्रेच्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होताना दिसतेय. अभिनेत्री ईशा डे, गौरवनंतर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमापासून ब्रेक घेतलेल्या एक विनोदवीराची चर्चा सुरुय. हा  अभिनेता आता नव्या दमाने महाराष्ट्राला हसवायला हास्यजत्रेत परतणार आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षांनंतर ‘शिवाली हे खरं आहे’? हे स्कीटमध्ये तो दिसणार असल्याने सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे. हा अभिनेता म्हणजे निमिष कुलकर्णी. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या कलाकाराने आपल्या भन्नाट कॉमेडीने खास स्थान निर्माण केलं होतं. आता काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर निमिष पुन्हा एकदा या शोमध्ये जोशात परतताना पाहायला मिळणार आहे.

समीर चौगुले, शिवाली परब आणि निमिष कुलकर्णी यांच्या जबरदस्त अभिनयामुळे हे स्किट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं होतं. साधारण दोन वर्षांपूर्वी या स्किटचा शेवटचा भाग प्रसारित झाला होता. त्या वेळी ‘शिवाली हे खरं आहे’ने केवळ टीव्हीपुरतंच नाही, तर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगवली होती.

भन्नाट कॉमिक टायमिंगची पुन्हा एकदा झलक

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चाहत्यांसाठी आज, मंगळवार 14 एप्रिलचा एपिसोड खास ठरणार आहे. कारण प्रेक्षकांचा लाडका कलाकार निमिष कुलकर्णी पुन्हा एकदा धमाकेदार एन्ट्री घेत आहे. विशेष म्हणजे, निमिष, समीर चौघुले आणि शिवाली परब यांचं प्रचंड गाजलेलं ‘शिवाली हे खरंय?’ हे स्कीट आज पुन्हा रंगमंचावर झळकणार आहे. इतकंच नाही तर निमिष आज एक नव्हे, तर सलग दोन स्कीट्स घेऊन प्रेक्षकांना हसवणार आहे. सोनी मराठीने सोशल मीडियावर याचा प्रोमो शेअर करत चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

 

निमिषने अलीकडेच केलंय लग्न 

निमिषचं पुनरागमन पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याच्या भन्नाट कॉमिक टायमिंगची पुन्हा एकदा झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत आणि सोशल मीडियावर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातही निमिषने नवी इनिंग सुरू केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये त्याने कोमल भास्करसोबत लग्नगाठ बांधत आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. कोमल भास्कर ही देखील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असून ती मराठी इंडस्ट्रीत क्रिएटिव्ह हेड म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या जोडीचं प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही आयुष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम नेहमीच उच्च दर्जाच्या विनोदासाठी आणि उत्तम सादरीकरणासाठी प्रसिद्ध राहिला आहे. अशाच लोकप्रिय स्किट्समुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget