एक्स्प्लोर

Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

'Dev Khel' Controversy: 'देव खेळ'या वेब सिरीजवरुन प्रचंड वाद निर्माण झाला आहे.

Ashish Shelar on 'Dev Khel' Controversy: अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) आणि प्राजक्ता माळी  (Prajakta mali)यांचा 'देव खेळ' या वेब सिरीजचा टीझर प्रदर्शित होताच  गदारोळ निर्माण झाला होता.  सात भागांची ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Web Series) रिलीज झाली होती.  या वेब  सिरीजच्या टीझरमधून (Entertainment) गुहागर परिसरातील  श्रद्धास्थान असलेल्या शंकासूर या देवतेबाबत धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.  कोकणातील अनेक नागरिकांनीही या वेब सिरीजला विरोध दर्शवला होता. या सिरीजवर  कारवाई करण्यात यावी,  अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या वेब सिरीजवर कारवाई होणार, असं त्यांनी विधानसभेत सांगितलं. 

या वेब सिरीजबाबत आशिष शेलार विधानसभेत म्हणाले, 'शंकासूरातही आम्ही देव पाहतो.  शंकासूर यांच्या माध्यमातून कुप्रथांवर प्रहार करण्याची लोककलेची परंपरा आहे, असे आम्ही मानतो.  त्या वेब सिरीजवर कारवाई करण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधी आणि  नेत्यांची पत्रे माझ्याकडे आली होती',  असं त्यांनी सांगितलं. 'या प्रकरणी पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.   तसेच केंद्र सरकार आणि गृहमंत्रालयातही याबाबत माहिती देण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे', असंही आशिष शेलार म्हणाले.  

'देव खेळ'वर कारवाईचे आदेश (Ashish Shelar Seeks Action Against Dev Khel)

 

काही महिन्यांपूर्वीही आशिष शेलार यांनी 'देव खेळ' या वेब सिरीजवर उचित कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. यासंदर्भात त्यांनी एक्स (ट्विटर)वर पोस्ट देखील शेअर केली होती.  दरम्यान, आज 'देव खेळ' हे लोकपरंपरेचा विपर्यास केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिले आहेत. 

सात भागांच्या या वेब सिरीजमध्ये अनेक कलाकारांच्या मुख्य भूमिका आहे. चंद्रकांत गायकवाड दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, वीणा जामकर,  ओंकार भोजने, मंगेश देसाई यांसह इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Deo Maherchi Saadi: 'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
'माझ्या नावे अजून एक फ्लॉप चित्रपट'; अजिंक्य देव 'माहेरची साडी'बाबत काय म्हणाले? सगळे रडले अन्...
Marathi Actress Second Marriage: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, होणारा नवरा आहे तरी कोण?
Rakhi Sawant: राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
राखी सावंतनं तरुणाला म्हटलेलं 'नामर्द'; त्याने आयुष्यच...एका प्रकरणामुळे ड्रामा क्विन कायदेशीर कचाट्यात
‘त्वचेच्या समस्येवर मात करत स्वतःवरचा विश्वास जपला, माझ्यातील देवीशक्तीने मला खंबीर बनवलं!’कमळी' फेम अभिनेत्रीनं सांगितला प्रेरणादायी प्रवास
‘त्वचेच्या समस्येवर मात करत स्वतःवरचा विश्वास जपला, माझ्यातील देवीशक्तीने मला खंबीर बनवलं!’कमळी' फेम अभिनेत्रीनं सांगितला प्रेरणादायी प्रवास

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
Embed widget