![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Maharashtra Bhushan Award 2020: आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
![Maharashtra Bhushan Award 2020: आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव maharashtra Bhushan Award announced to Asha Bhosle gets wishes from many Maharashtra Bhushan Award 2020: आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, अनेकांकडून अभिनंदनाचा वर्षाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/25/630ec5080a4d2c63486ca685dfc255c4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. आशा भोसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.@ashabhosle
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 25, 2021
मंत्री विजय वडेट्टीवार
आपल्या सुरेल आवाजाने देशातील कोट्यावधी संगीत रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ताईंचे मन:पूर्वक अभिनंदन .#MaharashtraBhushan @ashabhosle #Maharashtra #Ashabhosle pic.twitter.com/BO9e9Xz0rv
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 25, 2021
राधाकृष्ण विखे पाटील
आशाताई भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!@ashabhosle pic.twitter.com/hnD0jtyxxY
— R Vikhe Patil (@RVikhePatil) March 25, 2021
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
आपल्या सुमधूर आवाजात २० पेक्षा अधिक भाषांमधील हजारो गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या सदाबहार गायिका आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. 💐@ashabhosle pic.twitter.com/yuVsVwi9Kz
— Balasaheb Thorat (@bb_thorat) March 25, 2021
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर
नमस्कार. माझी बहिण आशा भोसले हीला २०२० सालचा अत्यंत मानाचा “महाराष्ट्र भूषण “ पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल मी आशाचे मन:पूर्वक अभिनंदन करते आणि तिला आशिर्वाद देते. pic.twitter.com/IcSFKFAA8F
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) March 25, 2021
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)