एक्स्प्लोर

Magic Upcoming Marathi Movie: एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक'; भाईजानकडून मराठी अभिनेत्याच्या सस्पेन्स, थ्रीलर सिनेमाचा ट्रेलर लाँच

Magic Upcoming Marathi Movie: तुतरी व्हेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Magic Upcoming Marathi Movie: अभिनेता जितेंद्र जोशीची (Actor Jitendra Joshi) प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक' (Magic Movie) काय आहे, असा प्रश्न या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरनं निर्माण केला आहे. नुकताच सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सायकोलॉजिकल पद्धतीनं गोष्ट उलगडणारा 'मॅजिक' हा चित्रपट नव्या वर्षात, 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.                    

तुतरी व्हेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांची छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे.                

एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने केलेला एन्काउंटर आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची गोष्ट "मॅजिक" या चित्रपटात आहे. एन्काऊंटर केल्यानंतर हा पोलिस अधिकारी गावी येतो, पण एक मुलगी तिथं पोहोचते आणि मग सुरू होतो एक वेगळा खेळ... हे नेमकं प्रकरण काय आहे, एन्काऊंटर आणि अत्तर यांचा काय संबंध असतो, ती मुलगी नेमकी कोण असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच मिळणार आहेत. प्रचंड गुंतागुंत, सायकोलॉजिकल गोष्ट, उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक आणि महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला 'मॅजिक' हा चित्रपट 1 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 

ट्रेलर पाहिलात? 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suraj Chavan New Home Name Plate Viral: ना बिग बॉस, ना अजितदादा; सूरज चव्हाणच्या आलिशान घराला कुणाचं नाव? बंगल्याबाहेरची 'नेमप्लेट' ठरतेय चर्चेचा विषय

महत्त्वाच्या बातम्या

Colors Marathi Serials: ‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget