एक्स्प्लोर

Ma Behen Trailer: ‘बॉडी’ लपवता लपवता मायलेकीची दमछाक; माधुरी दीक्षितचा डोकं चक्रावणारा सिनेमाचा ट्रेलर पाहिलात?

Ma Behen: माधुरी दीक्षित नुकतीच ‘देशपांडे’ या वेबसीरिजमध्ये सिरीयल किलरच्या भूमिकेत दिसली होती.

Ma Behen: माधुरी दीक्षित, तृप्ती डीमरी आणि रवीकिशन प्रमुख भूमिकेत असलेल्या क्राइम कॉमेडी ड्रामाचा (Crime Comedy Movie) ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात खतरनाक सस्पेन्ससोबत भरपूर कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या OTT चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता ट्रेलर समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित नुकतीच ‘देशपांडे’ या वेबसीरिजमध्ये सिरीयल किलरच्या भूमिकेत दिसली होती. आता ती पुन्हा एकदा क्राइमच्या दुनियेत परतली आहे. मात्र, यावेळी क्राइमसोबत जबरदस्त कॉमेडीही पाहायला मिळणार आहे. (OTT Release)

‘मां बहन’चा ट्रेलर चर्चेत

‘मां बहन’च्या ट्रेलरमध्ये अनेक ट्विस्ट आणि सस्पेन्स दाखवण्यात आले आहेत. आई आणि तिच्या दोन मुलींच्या आयुष्यात प्रचंड खळबळ उडते, जेव्हा त्यांच्या घरात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडतो. तो लपवण्यासाठी या तिघींची चांगलीच धावपळ उडते. ट्रेलरची सुरुवात रेखा (माधुरी दीक्षित) आणि तिच्या दोन मुली जया (तृप्ती डिमरी) व सुषमा (धरना दुर्गा) यांच्या सततच्या भांडणांनी होते. दरम्यान, शेजारी राहणारे गुप्ताजी (रवि किशन) हे रेखावर फिदा असतात. पण एक दिवस अचानक गुप्ताजींचा मृतदेह त्यांच्या घरात आढळतो आणि तिथून कथेला मोठं वळण मिळतं. यानंतर हे गुपित लपवण्याच्या प्रयत्नात तिघींच्या आयुष्यात नवनवीन अडचणी निर्माण होतात. 2 मिनिटे 46 सेकंदांचा हा ट्रेलर सस्पेन्स, क्राइम आणि कॉमेडीने भरलेला आहे.

कधी आणि कुठे रिलीज होणार?

सुरेश त्रिवेणी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मां बहन’ हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर थेट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 4 जून 2026 पासून हा चित्रपट OTT वर स्ट्रीम होणार आहे.चित्रपटात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, धरना दुर्गा आणि रवि किशन यांच्यासोबत अरुणोदय सिंह आणि गीतांजली कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget