लातूर : राजकारणाशी रितेश देशमुखचे (Ritesh Deshmukh)  जुने नाते आहे. रितेशचे वडील स्व. विलासराव देशमुख यांनी  बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. मात्र रितेश देशमुख हे कायम राजकारणापासून दोन हात दूर आहेत.रितेशची दोन्ही भाावंडे राजकारणात आहे. निवडणुकांच्या काळात कायमच ते राजकरणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण येते.  राजकरणात येण्याच्या प्रश्नावर रितेश देशमुख म्हणाला, माझे दोन भाऊ असताना माझे राजकारणात काय काम आहे. रितेश देशमुखांनी पत्नी जिनिलियासह लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधाताना त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे . तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 


रितेश देशमुख म्हणाला,   आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांना घराबाहेर जाऊन मतदानाचा हक्क बजवावा. मी फक्त आज मतदान करण्यासाठी मुंबईहून लातूरला आलो आहे. आज रात्री परत ट्रेन पकडून पुन्हा मुंबईला जाणार आहे.  ऊन प्रचंड आहे. पण एक दिवस थोडा त्रास सहन आपण आपल्या देशासाठी सहन करु शकतो. प्रत्येकाला वाटते की एका मतदानाने काय फरक पडणार पण प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहेत.  देशासाठी हा त्रास सहन करणे महत्त्वाचे आहे. 


रितेश देशमुख राजकारणत एन्ट्री करणार?


रितेश देशमुखांनी लातुरमध्ये आई, पत्नी जिनिलिया देशमुखसह मतदानाचा अधिकार बजावला आहे.  राजकारणात येणाऱ्या सर्व चर्चांना फेटाळले. राजकारणात एन्ट्री करण्याच्या प्रश्नावर रितेश देशमुख म्हणाला, माझे दोन्ही भाऊ असताना माझी काय गरज आहे.   सध्या मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र दिसते आहे. परंतु कोणीही कंटाळा न करता आवर्जून मतदान करावे. मतदान हा आपला हक्क आहे.  


महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी ट्रेनने लातुरात


रितेश आणि जिनिलिया हे महाराष्ट्राचे नाही तर बॉलीवूडची देखील लाडकी जोडी आहे.जिनिलिया आणि रितेशच्या साधेपणा कायमच प्रेक्षकांची मन जिंकतो. गणेशोत्सवासाठी आईच्या  जुन्या साडीचा वापर तयार केलेले कपडे किंवा कोरोनाच्या काळात बाभळगावातील ट्रॅक्टर सवारीने प्रेक्षकांची मन जिंकले आहेत.   रितेशने यापूर्वी ही लातूरला कुटुंबासोबत लातूरला गेल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले. आज देखील लातूरला मतदानासाठी ट्रेनने प्रवास करत आले आहेत. त्यामुळे रितेशचे कौतुक होत आहे.   


बाभुळगाव तर माझे गाव : जिनिलिया देशमुख


जिनिलिया म्हणाली, मतदान हा सर्वांचा हक्क आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे . बाभुळगाव तर माझे गाव आहे. त्यामुळे आम्ही मुंबईहून मतदान करण्यासाठी आलो आहे. 


Video :