Panchang 7 May 2024 : ग्रहांची स्थिती पाहता, आज 7 मेचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, मंगळवार, 7 मे रोजी, चंद्र मेष राशीत जाईल, जिथे सूर्य आणि बुध यांचा संयोग त्याच्यासोबत तयार होत आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असल्याने ही तिथी दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते.


आज दर्श अमावस्येच्या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग, बुद्धादित्य योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दर्श अमावस्येच्या दिवशी 5 राशींना शुभ योगाचा लाभ मिळणार आहे. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरेल. मेष राशीचे लोक आज डोकं लावून पैसे कमवण्यात यशस्वी होतील आणि त्यांना नवीन प्रकल्प सुरू करण्याची सुवर्णसंधी देखील मिळेल. व्यवसायिक आज बक्कळ पैसे कमावतील, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याची संधी देखील मिळेल. लव्ह लाईफमधील लोकांसाठी आजचा दिवस प्रेमाने भरलेला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत रोमँटिक दिवस घालवण्याची संधी मिळेल. जीवनात पुढे जाण्याचा नवा उत्साह तुम्हाला मिळेल. कौटुंबिक नाती अधिक घट्ट होतील आणि आई-वडिलांची सेवा करण्याची संधीही मिळेल. संध्याकाळी धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मानसिक शांती मिळेल.


मिथुन रास (Gemini)


आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळाल्यामुळे लाभाच्या अनेक संधी मिळतील. सकाळपासून तुम्हाला एकामागून एक अनेक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आज व्यावसायिकांना नवीन डील मिळू शकतात, ज्यामुळे त्यांना अधिक नफा मिळू शकेल. तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव पाडाल, ज्यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल आणि प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवाल. नोकरदारांसाठी दिवस चांगला असेल. जर कुटुंबातील कोणी आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असेल तर आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला व्यवसायात चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुकही होईल. आज तुम्हाला प्रियकरासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. नोकरीतील लोकांना आज त्यांच्या अधिका-यांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे ते आपली कामं वेळेवर पूर्ण करतील आणि मजेत वेळ घालवतील. आज तुम्हाला मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधीही मिळेल. कन्या राशीच्या लोकांच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यास तयार असतील.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज सरकारी क्षेत्रातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळू शकतो. आज तुम्हाला तुमच्या कामात मोठं यश मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप सन्मान मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते, हा दिवस तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि तुम्ही कामात खूप लक्ष द्याल. आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल. विवाहित लोक आपल्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवतील. भावा-बहिणींसोबतचं नातंही घट्ट होईल आणि त्यांच्या मदतीने घरातील अनेक कामं पूर्ण होतील.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा असणार आहे. आज कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाच्या दाट संधी आहेत. या राशीचे लोक ज्यांना नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत मिळतील आणि तुम्ही कठोर परिश्रमाने नवीन स्थान प्राप्त कराल. व्यवसायात तुम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सक्षम असाल आणि आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. आज तुम्हाला आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. तुम्ही प्रियकरासोबत रोमँटिक डिनर डेटवर जाऊ शकता आणि त्यांच्यासोबत निवांत क्षणांचा आनंद घेऊ शकतात. भागीदारीत काम करणं तुमच्यासाठी चांगलं राहील आणि गुंतवणूक तुमचं भविष्य सुरक्षित करेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 7 May 2024 : आज दर्श अमावस्येचा दिवस 'या' राशींसाठी खास; तर 'या' 3 राशींना करावा लागणार समस्यांचा सामना, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य