Lata Mangeshkar :  गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींनी जरी संपूर्ण आयुष्य मुंबईत घालवलं असलं तरी त्यांचे पुणे शहराशी जिव्हाळ्याचे संबंध होते. वयाच्या 12-13 व्या वर्षी त्या पुण्यातील शुक्रवार पेठेत कुटुंबासमवेत वास्तव्यास होत्या.  या घराची एक आठवण म्हणजे, मास्टर दीनानाथ यांनी आयुष्याच्या अंतिम पर्वामध्ये लतादीदींनी बोलवून त्यांना तानपुरा तसेच डायरी सुपूर्द केली होती. 


या ऐतिहासिक जागेवर दीनानाथ मंगेशकर यांचे नाव तसेच ते जेव्हा राहत होते ते साल साल नमूद आहे. सध्या या वाड्यात मंगेशकर कुटुंब राहत नसलं तरी या घराच्या आठवणी अनेक आहेत. एखाद्या स्मृतिदिनी हृदयनाथ मंगेशकर स्वतः या घरी येऊन गायन करतात.  


लतादीदींच्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचं सादरीकरण सोलापुरात!


लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात तशी 1942 मध्ये झाली. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. मात्र त्या आधी 1938 साली त्यांनी सोलापुरात पहिल्यांदा गायन केलं होतं.  त्यांनी ही खास आठवण आपल्या ट्विटरवरुन शेअर केली होती. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं क्लासिकल सादरीकरण हे सोलापुरात केलं होते. तिथला एक खास फोटो देखील त्यांनी ट्वीट केला होता.  


त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, आज आमच्या ओळखीचे उपेंद्रे चिंचोरे यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की मी माझा पहिला क्लासिकल परफॉर्मन्स माझ्या वडिलांसोबत 9 सप्टेंबर 1938 रोजी सोलापूर येथे केला होता. हा फोटो त्यावेळी प्रसिद्धी साठी काढला होता. विश्वास बसत नाही की गाणी गाता गाता 83 वर्ष पूर्ण झाली, असं लतादिदींनी म्हटलं होतं. 


सोलापुरातल्या भागवत चित्रमंदिरात 9 सप्टेंबर 1938 साली लता दिदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्य़क्रमाचे आयोजक मास्टर दिनानाथ मंगेशकरांकडे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आले होते. अवघ्या 9 वर्षाच्या लतादिदींनी हे सर्व ऐकले. ऐकल्यानंतर वडीलांसोबत गाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी लता दिदींचे वाक्य ऐकून मास्टर दिनानाथ हसले आणि जाहिर मंचावर गाण्यासाठी तू खूप लहान आहे. तुला आणखी खूप गाणं शिकायचं आहे. असे म्हटल्याचे लता दिदी एका मुलाखतीत म्हटल्या होत्या. 


संबंधित इतर बातम्या


 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट