एक्स्प्लोर

Lakshmichya Pavlanni:'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत नवा ट्विस्ट! कलाची Exit नव्या नायिकेची एन्ट्री; प्रोमो पाहून चाहत्यांना धक्का

सध्या या मालिकेत एक नवाच ट्विस्ट आलाय. कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशा केसकर मालिका सोडणार असल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरल्यात.

Lakshmichya Pavlanni: 'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अद्वैत आणि कला या दोघांच्या जोडीने अगदी काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मनं जिंकली. चांदेकर आणि कलाच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. पण, सध्या या मालिकेत एक नवाच ट्विस्ट आलाय. कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशा केसकर मालिका सोडणार असल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरल्यात. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेला एक नवं वळण लागलंय.  या संदर्भातील प्रोमो सध्या समोर आलाय. या प्रोमोमध्ये कला मरणाच्या दारात उभी असल्याचा दाखवण्यात आलंय. अद्वैत तिच्यासाठी गाणं म्हणतोय.अद्वैतच गाणं ऐकता ऐकताच कला शेवटचा श्वास घेते असं या प्रमोत दाखवण्यात आलंय. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनाही धक्का बसलाय. 

नेमकं काय आहे प्रोमोत?

लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत कलाला राहुल आणि आत्याचा सत्य कळतं. हेच अद्वैतला सांगायला ती जाणार एवढ्यात तिचा अपघात होतो. तिच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. जी सुकन्या तिला रुग्णालयात नेते तिला हृदयाचा त्रास आहे त्यामुळे कला आपलं हृदय सुकन्याला देणार आहे. अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर या मालिकेत सुकन्याचं पात्र साकारणार आहे. अशातच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय.

या प्रोमोत ऑक्सीजन मास्क लावलेल्या कलासमोर चांदेकर येतो तेंव्हा कलाला त्यांच्या घराचा सत्य अद्वैतला सांगायचं असतं. भरलेल्या डोळ्यांनी चांदेकर कलासमोर येतो तेव्हा ती त्याला गाणं म्हणायला लावते. त्याचवेळी कलाच्या चेहऱ्यावरचे भाव थांबतात. कलाचा शेवट पाहताना चाहतेही रडकुंडीला आले. अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स केल्या आहेत. कला मालिका सोडणार असल्याचं कळताच अनेकांनी 'कलाला कुणीही रिप्लेस करू शकत नाही,तिचं पात्र गेलं तर मालिका कोण बघणार " कला आणि अद्वैतमुळे ही मालिका बघावीशी वाटते ' अंगावर काटा आला .. 'अशा कमेंट्स केल्या आहेत.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by star_marathi_serial_official (@star_marathi_serial_official)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marathi Serials Official (@marathiserials_official)

दुसरीकडे स्टार प्रवाहने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कलाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी अद्वैत मंदिरात गेलेला दिसतो. तिथे सुकन्या देवीसमोर प्रार्थना करत हे तुझे इच्छेने झाल्याचं सांगते. आता हे हृदय देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला भेटून त्यांचे मनापासून आभार मानायचेत असं म्हणताच ती अद्वैतला धडकते. ते दोघे एकमेकांकडे बघतात. कलाच्या हृदयात अद्वैत असल्यामुळे सुकन्या ही अद्वैतच्या प्रेमात पडते का? याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget