Kylie Jenner Pregnant : अमेरिकन सोशल स्टार काइली जेनरने (Kylie Jenner) कॉस्मॅटिक्सच्या जगात तिची एक ओळख निर्माण केली आहे. कायलीने फॅशनच्या जगात नाव कमवल्यानंतर नुकतच तिने तिचा क्लोथिंग ब्रँड देखील सुरु केला आहे. Khy असं तिच्या या ब्रँडचं नाव आहे. एक यशस्वी उद्योजिकेसोबतच काइली एक आई देखील आहे. पण पुन्हा एकदा काइली ही आई होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


काइलीने तिच्या एक्स पार्टनर ट्रॅविस स्कॉटसोबत स्टॉर्मी आणि ऐरे या दोन मुलांचं स्वागत केलं. पण स्कॉटसोबत नातं तुटल्यानंतर तिच्या आयुष्यात टिमोथी चालमेटीची एन्ट्री झाली. त्यातच आता ती टिमोथीच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी समोर आली आहे. 


लोकप्रिय अमेरिकी कॉमेडियनचा दावा


लोकप्रिय अमेरिकी कॉमेडियन आणि अॅक्टर डॅनियल तोशने दावा केला आहे की, काइली आणि टिमोथी हे लवकरच आईबाबा होणार आहेत. डॅनिलने त्याच्या पॉडकास्ट शो 'टॉश शो'मध्ये याविषयी भाष्य केलं आहे. त्यानं म्हटलं की, काइली आणि टिमोथी हे लवकरच एका चिमुकल्याचं स्वागत करणार आहेत. तसेच  'The Kardashians' या कार्यक्रमात हे दोघेही त्यांच्या प्रेग्नंसीबद्दल रिवील करतील, असंही त्यानं म्हटलं. 


काइली आणि टिमोथीचं मौन


त्याच्या या चर्चांमुळे काइली आणि टिमोथी यांच्या घरी लवकरच चिमुकल्याचं स्वागत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु काइली आणि टिमोथीबाबत सुरु असलेली ही चर्चा खोटी असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळे या चर्चांवर काइली आणि टिमोथी यांनी मौन बाळगलं असून यावर त्या दोघांकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाहीये. 


काइली आणि टिमोथी यांच्या नात्याला 2023 मध्ये सुरुवात झाली. सप्टेंबरमध्ये ते Beyoncé च्या Renaissance World Tour गेले त्यावेळी त्यांनी त्यांचं नातं जाहीर केलं. त्यानंतर ते न्यूयॉर्क फॅशन वीक, 2023 यूएस ओपन मेल फायनल, सॅटरडे नाईट लाइव्ह आफ्टरपार्टी यांसारख्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. तसेच जेनर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीमध्येही दोघे एकत्र पाहायला मिळाले. 






ही बातमी वाचा : 


महेश भट्ट यांच्यासोबतचं नातं, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याच्या चर्चा; सिनेसृष्टीतून अचानक का गायब झाल्या होत्या परवीन बाबी?