Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरूवात, या खास प्रसंगी भारी तर दिसायलाच हवं.. या दिवशी तुम्हाला ट्रेडिशनल पण स्टायलिश लूक हवा असेल तर या सिल्क साड्यांचे डिझाइन्स एकदा पाहाच... जर त्या तुम्ही नेसल्या तर सर्वांमध्ये उठून दिसाल, आणि एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे दिसाल... साडीला स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही तिला अनेक प्रकारे ड्रेप करू शकता. यासाठी लेटेस्ट फॅशन ट्रेंडची (Fashion) विशेष काळजीही घेतली पाहिजे.


 


सणासुदीला साडी नेसायला आवडते....


सणासुदीला साडी सर्वांनाच नेसायला आवडते. तसा साडीचा ट्रेंड कधीच फॅशनच्या बाहेर जात नाही. यासाठी, तुम्हाला ऑनलाइन ते ऑफलाइनपर्यंत विविधता पाहायला मिळेल. अशात, गुढीपाडवा जवळ आला आहे. या प्रसंगी तुम्ही सिल्क फॅब्रिकची साडी नेसू शकता. तर, आज आम्ही तुम्हाला सिल्क साड्यांच्या काही खास डिझाइन्स दाखवणार आहोत आणि त्यांना स्टाइल करण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत-


 


लाल रंगाची सिल्क साडी


 लाल रंग हा सदाबहार फॅशन ट्रेंडमध्ये राहिला आहे आणि त्याला खूप आवडलाही आहे. विशेषत: नवविवाहित वधूंना या प्रकारची साडी नेसणे आवडते. अशाच प्रकारची साडी तुम्हाला 3,000 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते. या प्रकारच्या साडीसह हिरव्या रंगाचे दागिने स्टाइल करू शकता.


 






 


ऑफ व्हाईट कलरची साडी


हा रंग अतिशय लाईट पण सुंदर स्वरूप देण्यास मदत करेल. या सुंदर रॉयल लूकची साडी डिझायनर जरी बनारसने डिझाइन केली आहे. या प्रकारची स्टायलिश लूकची साडी तुम्हाला 3,500 रुपयांना बाजारात सहज मिळू शकते.




 


सोनेरी रंगाची साडी


यामध्ये तुम्हाला बॉर्डर वर्क असलेल्या अनेक डिझाइन केलेल्या साड्या पाहायला मिळतील. ही रॉयल लेस साडी डिझायनर अर्पिता मेहता यांनी डिझाइन केली आहे. तुम्हाला या प्रकारची साडी बहुतेक टिश्यू किंवा चंदेरी सिल्कमध्ये दिसेल. फॅब्रिकच्या गुणवत्तेनुसार त्याची किंमतही तुम्हाला मिळेल.


 




 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Fashion : साध्या साडीला द्या 'स्लीव्हलेस ब्लाउजची' जोड! 'या' नव्या डिझाईन्स ट्राय करा, मग बघा कमाल...