एक्स्प्लोर

Sanchita Ugale : बहीण 5.30 वाजता घराबाहेर पडली, घरी परतली तेव्हा सगळंच उद्ध्वस्त झालेलं; जीवन संपवण्यापूर्वी संचिता उगलेसोबत नेमकं काय घडलं?

Sanchita Ugale : 'वागळे की दुनिया' फेम अभिनेत्री संचिता उगले हिनं तिचं आयुष्य संपवलं. घरी कोणी नसताना संचितानं मोठं पाऊल उचललं. शेवटच्या एक तासात नेमकं काय घडलं?

Sanchita Ugale news: टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. वयाच्या 30 व्या वर्षी (Actress) तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला (Entertainment) मोठा धक्का बसला आहे. टेलीचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीनं राहत्या घरी गळफास घेवून आयुष्य संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी 6:30 ते 7:30 च्या दरम्यान, घडल्याची माहिती आहे.  अभिनेत्रीने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  तिच्या कुटुंबाने कोणतीही माहिती दिलेली नाही.  

'वागळे की दुनिया' आणि 'कुमकुम भाग्य' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री संचिता उगले हिने टोकाचं पाऊल उचलल्याने हळबळ व्यक्त होत आहे. नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरातील राहत्या घरी तिने आत्महत्या करत आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतला. या घटनेची माहिती समोर येताच चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. संचिता उगले ही तिचे आई-वडील आणि धाकटी बहीण अंजली यांच्यासोबत आचोळे गावातील घरात राहत होती. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेच्या वेळी घरात संचिता एकटीच होती. तिची 15 वर्षीय धाकटी बहीण अंजली सायंकाळी सुमारास 5.30 वाजता काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती.

Sanchita ugale : पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला

घरी कोणीही नाही हे पाहून संचिता संध्याकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास बेडरूममध्ये गेली. बेडरूमला आतून कडी लावली आणि पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला. काही वेळानंतर संचिताची बहीण आणि आई-वडील पुन्हा घरी आले तेव्हा सगळं उद्धवस्त झालं होतं. संचिताला तात्काळ महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कोणतीही चिठ्ठी किंवा आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारा पुरावा आढळून आलेला नाही.

 त्यामुळे संचिता उगले हिनं हे टोकाचं पाऊल का उचलले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. संचिता उगले ही छोट्या पडद्यावरील ओळखीचा चेहरा होती. 'वागळे की दुनिया' या लोकप्रिय मालिकेत तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय 'कुमकुम भाग्य' या हिंदी मालिकेतही तिनं काम केलं होतं. 'छावा' चित्रपटात तिने महाराणी ताराराणी यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेही ती चर्चेत आली होती.

Who is Sanchita ugale : कोण आहे संचिता उगले ? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अभिनेत्री आपल्या आई- वडील आणि बहिणीसोबत नालासोपारा येथे राहत होती. घटना घडली तेव्हा अभिनेत्री घरी एकटीच होती.  पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.  तिच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री टेलिव्हिजन आणि सिनेमातून  ओळख निर्माण करत होती.  तिला खरी ओळख 'झी टीव्ही'वरील 'कुमकुम भाग्य' या मालिकेमुळे मिळाली. 'वागले की दुनिया' या मालिकेतही तिनं काम केलं.   नंतर तिनं 'दंगल टीव्ही' वाहिनीवरील, 'दिलवाली दुल्हा लै जाएगी' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती.  तिच्या अभिनयातून तिला टीव्ही विश्वात विशेष ओळख मिळाली. 

Sanchita ugale :  मालिकांसह सिनेमातही काम केलं 

टेलिव्हिजन जगतात काम करण्याव्यतिरिक्त, अभिनेत्रीनं सिनेमा आणि स्ट्रीमिंग प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. विशेष म्हणजे तिनं विकी कौशलच्या 'छावा' या ऐतिहासिक सिनेमात महाराणी 'तारा राणी' यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती.   अभिनेत्रीनं मनोज बाजपेयी यांच्या 'सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआऊट' या सिनेमातही काम केलं. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रिय होती. संचिताचा चाहतावर्ग खूप मोठा होता. दरम्यान, अभिनेत्रीनं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

Sanchita ugale :  शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते शॉकमध्ये!

अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजन विश्वावर आणि तिच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूच्या अवघ्या काही तास आधीच तिने सोशल मीडियावर आपली शेवटची पोस्ट शेअर केली होती. या शेवटच्या व्हिडीओमध्ये ती प्रसिद्ध गाणं 'डफली वाले डफली बजा' गुणगुणताना आणि त्यावर थिरकताना दिसत होती. तिच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा अवघ्या काही तासांपूर्वीचा हसता-खेळता व्हिडीओ पाहून चाहत्यांचा तिच्या जाण्यावर विश्वासच बसत नाहीये. अनेकांनी तिच्या इन्स्टाग्रामवरील या शेवटच्या पोस्टवर कमेंट्स करत तीव्र दुःख व्यक्त केले असून तिला श्रद्धांजली वाहिली आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Embed widget