Kriti Sanon Visits Siddhivinayak Temple With Family : बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन सध्या खुप चर्चेत आहे. तिला 'मिमी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर क्रितीचा आणि तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेना. तिने लगेच सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पुरस्कार ज्युरी सदस्यांचे आभार मानत सिनेमाच्या टिमचेही आभार मानले होते. 


कृती सेननने मिमी या चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनेत्रीचा अभिनय उत्कृष्ट होता, त्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीसोबतच आलिया भटलाही गंगूबाई काठियावाडीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं ही काही साधी गोष्ट नाही. कृतीसाठी हा खूप मोठा क्षण होता.  या पुरस्काराच्या घोषणेनंतर अभिनेत्री आज सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. यावेळी त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी तिची बहीण, आई आणि वडिलांसोबत मंदिरात जाताना दिसली. एका व्हिडीओमध्ये क्रिती पिवळ्या रंगाचा सूटमध्ये दिसत आहे. देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर तिने पापाराझींना प्रसादही वाटला. तिचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


तसेच तिने सोशल मिडीयावर तिने एक पोस्ट शेअर करत तिने कुटुंबाचे आभार मानले आहेत. कृतीने पुढे लिहिले आहे, "आई-बाबा तुमच्या आशीर्वादामुळे मी हा अॅवार्ड जिंकला आहे. आलिया भट तुझे देखील खूप खूप अभिनंदन. मला तुझ्यासोबत हा मोठा क्षण शेअर करायला मिळाला!' कृतीच्या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत."






कृतीचे चित्रपट


कृतीला  'मिमी' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मिमी हा चित्रपट 2021 रोजी रिलीज झाला. कृतीनं या चित्रपटात मिमी राठोड ही भूमिका साकारली. या चित्रपटासाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरनं देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. कृतीचा 'आदिपुरुष'  हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. आता कृतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Dev Kohli Passed Away : 'मैंने प्यार किया' आणि 'बाजीगर' अशा सुपरहिट सिनेमांचे गीतकार देव कोहली यांचे निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास