Kriti Sanon First Film As A Producer:  अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. क्रिती आता निर्माती झाली आहे. आज (7 जुलै) क्रितीनं तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली.  'दो पत्ती' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री  काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट असणार आहे. क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर करुन  'दो पत्ती' या चित्रपटाची घोषणा केली.


क्रितीच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ब्लू बटरफ्लाय फिल्म्स असं आहे. क्रितीनं  सोशल मीडियावर काजोल, कनिका ढिल्लन आणि मोनिकासोबतचा एक फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं- 'मला या तीन स्ट्राँग, प्रेरणादायी, प्रतिभावान महिलांसह 'दो पत्ती' ची घोषणा करताना खूप आनंद होत आहे.  मोनिका, आमच्या चित्रपटासाठी नेटफ्लिक्सपेक्षा चांगल्या व्यासपीठाबद्दल विचार करू शकत नाही. 8 वर्षांनंतर काजोल मॅडमसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. कनिका- तुझे लिखाण मला नेहमीच आवडते.  ब्लू बटरफ्लाय फिल्म्सचा हा पहिला चित्रपट आहे. ' क्रितीनं शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी क्रितीच्या पोस्टला लाइक केलं आहे.


एका मुलाखतीमध्ये काजोलनं 'दो पत्ती' या चित्रपटाबद्दल सांगितलं,   'त्रिभंगा आणि लस्ट स्टोरीज 2 नंतर पुन्हा एकदा नेटफ्लिक्ससोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटात मला काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळणार असून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. दो पट्टीमध्ये अॅडव्हेंचर आणि मिस्ट्री दोन्ही दिसेल.'






क्रितीचा आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी  रिलीज झाला. आदिपुरुष या चित्रपटात  प्रभासनं रामाची भूमिका साकारली. तर  कृतीनं या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली. क्रितीच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता क्रिती ही प्रोड्युसर म्हणून काम करणार आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'दो पत्ती' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Adipurush: 'तिरुपतीची शुद्ध आणि शक्तिशाली ऊर्जा...'; गुडबाय किसच्या वादादरम्यान क्रितीची पोस्ट