एक्स्प्लोर

Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत

Kriti Sanon-Kabir Bahia: दोघे अनेकदा एकत्र दिसले असून, आता त्यांनी लॉर्ड्स मैदानावर एकत्र हजेरी लावल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.

Kriti Sanon-Kabir Bahia: अभिनेत्री कृती सेनन (Kriti Senon) पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे. रविवारी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेला भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना (IND vs Eng) पाहण्यासाठी कृती तिचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया याच्यासोबत स्टेडियममध्ये पोहोचली होती. सामन्यादरम्यानचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉयफ्रेंड कबीर बहियासोबत पाहिला सामना

गेल्या काही महिन्यांपासून कृती सेनन आणि कबीर बहिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघे अनेकदा एकत्र दिसले असून, आता त्यांनी लॉर्ड्स मैदानावर एकत्र हजेरी लावल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.

धोनीच्या लेकीसोबत केली धमाल

या सामन्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी उपस्थिती लावली होती. माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि अभिनेता अर्जुन कपूर हे देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. कृतीची जागा धोनी यांच्या जवळच होती. सामन्यादरम्यान कृती आणि धोनीची मुलगी झिवा धोनी यांच्यातील गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. दोघींचे एकत्र हसत-खेळत गप्पा मारतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून चाहत्यांची पसंती मिळवत आहेत.

कृती आणि कबीरचा स्टायलिश लूक

या सामन्यासाठी कृती सेननने काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. तर कबीर बहिया पांढऱ्या टी-शर्ट, डेनिम जीन्स आणि तपकिरी जॅकेटमध्ये दिसला. दोघांचाही कॅज्युअल आणि स्टायलिश लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. कृती सेननचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया हा चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. तो यूकेस्थित उद्योगपती असून एव्हिएशन आणि पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करतो. गेल्या काही महिन्यांपासून कृती आणि कबीर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना जोर आला असून, दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कृती सेनन नुकतीच 'कॉकटेल 2' या चित्रपटात शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत झळकली होती. यानंतर ती 'नो एंट्री 2', 'भेडिया 2' आणि 'डॉन 3' या आगामी चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
Sonakshi Sinha On CJP Protest : '20 जुलै लक्षात ठेवा..अनेकांची हाडं मोडली, देशाचंही मन तुटलं'; जंतरमंतर आंदोलनानंतर सोनाक्षी सिन्हाने शेअर केले अस्वस्थ करणारे फोटो 
'20 जुलै लक्षात ठेवा..'; जंतरमंतर आंदोलनानंतर सोनाक्षी सिन्हाने शेअर केले अस्वस्थ करणारे फोटो, म्हणाली..
Nimish Kulkarni New Marathi Film: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी सिनेमात; निमिष कुलकर्णीच्या आगामी सिनेमाचं नाव काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Embed widget