Kokan Hearted Girl Ankita Walawalkar Buy Audi: प्रसिद्ध सोशल मीडिया (Social Media) इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) आणि 'बिग बॉस मराठी सीझन 5'मुळे घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नेहमीच चर्चेत असते. 'बिग बॉस मराठी'पासून अंकीता घराघरात पोहोचली. सध्या कोकण हार्टेड गर्ल चर्चेत आहे ती तिच्या लगीनघाईमुळे. सध्या अंकीताची लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. पुढच्या महिन्यात अंकिता प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत आपली लग्नगाठ बांधणार आहे. अशातच अंकीताच्या आयुष्यात आणखी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंकिता आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन 'ती येतेय', 'ती आलीय... वाट बघतेय', अशा पोस्ट शेअर करत होती. यामुळे चाहत्यांच्या मनात एक कोडं निर्माण झालं होतं. अशातच आता तिनं चाहत्यांना एक गोड सरप्राईज दिलं आहे. अंकिताच्या आयुष्यात आलेली नवी पाहुणी दुसरी, तिसरी कुणी नसून एक आलिशान, नवीकोरी ऑडी कार आहे. चाहत्यांसोबत आपल्या नव्या कारची झलक शेअर करताना 'कोकण हार्टेड गर्ल'नं 'आवडी आली', असं कॅची कॅप्शन दिलं आहे.
अंकितानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आलिशान कार ऑडी आणि त्यासोबत अंकिता आणि कुणाल दोघेही दिसत आहेत. अंकिलानं नुकतीच आपली आधीची कार विकली होती. त्यानंतर तिनं चाहत्यांसोबत व्हिडीओ शेअर करुन दुसरी नवी गाडी घेण्याचा विचार होता, म्हणूनच मी जुनी गाडी विकली असं सांगितलं होतं. तसेच, सध्या मी दोन-तीन गाड्यांमध्ये कन्फ्युज आहे, त्यामुळे अंकिला नवी गाडी घेणार असल्याचं चाहत्यांना आधीपासूनच माहिती होतं. अखेर तिनं सरप्राईज देत, आपल्या आलिशान ऑडीची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी सीझन 5 संपल्यापासून अंकिता आपल्या लगीनघाईमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर 12 ऑक्टोबरला अंकितानं आपल्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख सर्वांना तिच्या सोशल मीडिया हॅन्डल्सवरुन करुन दिली. त्यानंतर येत्या फेब्रुवारीत ते दोघे लग्न करणार असल्याचं अंकितानं जाहीर केलं. तसेच, अंकिता आणि कुणालचा शाही विवाह सोहळा कोकणात पार पडणार असल्याचंही तिनं सांगितलं होतं. सध्या दोघेही लग्नाची तयारी आणि शॉपिंग करण्यात व्यस्त आहेत. अंकिताचा होणारा नवरा कुणाल भगतबाबत बोलायचं तर, कुणाल मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक आणि लेखकही आहे. कुणालनं अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :