Actress On Casting Couch: केवळ बॉलिवूडमध्येच (Bollywood) नाही तर टॉलिवूड (Tollywood) इंडस्ट्रीमध्येही अनेक सौंदर्यवती कास्टिंग काऊचच्या शिकार झाल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच अनेक तेलगु अभिनेत्रींनीदेखील आता कास्टिंग काऊचबाबत उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे. अशातच आता प्रसिद्ध तेलगु अभिनेत्री संध्या नायडूनंदेखील कास्टिंग काऊचबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. 2018 मध्ये तेलगु अभिनेत्री श्री रेड्डी हिनंही कास्टिंग काऊचबाबत अनेक खळबळजनक खुलासे केलेले. तसेच, कास्टिंग काऊचचा निषेध व्यक्त करण्यासाठी संध्यानं मोठं पाऊल उचललं होतं. तिनं रस्त्यावर टॉपलेस होऊन निषेध व्यक्त केलेला.


तेलुगू इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री श्री रेड्डी पाठोपाठ आता तेलुगू अभिनेत्री संध्या नायडू हिनंदेखील कास्टिंग काऊचबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. यावेळी ती पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली की, "मला मिळालेल्या बहुतेक भूमिका काकू आणि आईच्या होत्या. त्यामुळे ते लोक दिवसा शूटिंग सेटवर मला अम्मा म्हणायचे आणि रात्री झोपायला बोलावायचे."


अभिनेत्री संध्या नायडू पुढे बोलताना म्हणाली की, "त्यांच्यापैकी एकानं मला विचारलं की, मी काय घातलं आहे आणि ते ट्रान्सपरन्ट आहे का?" यावेळी, अभिनेत्रीनं असंही उघड केलं की, जेव्हा जेव्हा तिला कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा तिला विचारलं जायचं की, तिला हा रोल दिल्यानंतर त्या बदल्यात त्यांना काय मिळणार?" कास्टिंग काऊचबाबत उघडपणे बोलताना संध्या नायडूनं असाही दावा केला की, रोल मिळाल्यानंतर तिला  व्हॉट्सअॅप चॅट करण्यास भाग पाडलं गेलं.  याशिवाय, आणखी एक अभिनेत्री सुनीता रेड्डी हिनंही खुलासा केला की, तिला शुटिंग सेटवर बाहेर, सर्वांसमोर कपडे बदलावे लागले. त्यासोबतच अभिनेत्रीनं असा दावा केला की, तिला किड्यांसारखे वागवलं जात होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pushpa 2 Box Office Collection Day 37: आता अल्लू अर्जुन नाही, बॉक्स ऑफिसवर राम चरणचा ताबा; 37व्या दिवशी 'पुष्पा 2' गळपटला, किती कमावले?