KL Rahul , Athiya Shetty :   बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आथिया शेट्टी ( Athiya Shetty ) आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुल ( KL Rahul ) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. आथिया केएल राहुलसोबते फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.  'व्हॅलेंटाईन डे'  निमित्त के एल राहुलनं आथियासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोला राहुलनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 


राहुलनं आथियासोबतचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले,'Happy ❤️ day' राहुलनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये आथिया ही व्हईट टी शर्ट, ब्लॅक पँट आणि बॅग अशा लूकमध्ये दिसत आहे. तर राहुल हा कॅप व्हईट टीशर्ट आणि ग्रे पँट या कूल लूकमध्ये दिसत आहे. या फोटोवर आथियानं हार्ट इमोजी शेअर करून कमेंट केली आहे. तसेच टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफनं देखील या फोटोला कमेंट केली आहे.  










अथिया बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे.  आथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. काही दिवसांपूर्वी आथिया आणि रहुल हे लवकरच लग्न करणार आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण सुनील शेट्टीनं हे सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं.   ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली.  


संबंधित इतर बातम्या


Rudra Trailer : प्रतीक्षा संपली, Ajay Devgn ची पहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर प्रदर्शित


Doctor Strange Trailer : ‘डॉक्टर स्ट्रेंज’मध्ये ‘आयर्न मॅन’ परतला! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका


Amitabh Bachchan : बिग बी आहेत 'या' अभिनेत्रीचे फॅन; म्हणाले, 'त्या खूप सुंदर'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha