Odisha : 'डॉली की डोली' हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. या चित्रपटाचे कथानक एका अशा महिलेवर आधारित आहे जी पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पुरूषांसोबत लग्न करते आणि त्या पुरूषांचे पैसे चोरून पसार होते. अशीच काहीशी घटना ओडीशामध्ये (Odisha) घडली आहे. एका व्यक्तीनं चक्क 14 महिलांसोबत विवाह केला. या व्यक्तीला भुवनेश्वरमध्ये (Bhubaneswar) अटक करण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
भुवनेश्वरचे उपायुक्त उमाशंकर दाश यांनी सांगितले की, आरोपीने 1982 मध्ये पहिले लग्न केले त्यानंतर त्यानं 2002 मध्ये दुसरं लग्न केलं. त्या दोन पत्नींपासून त्या व्यक्तीला पाच मुलं देखील होती. ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील पाटकुरा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावातील एका महिलांकडून पळून जाण्यापूर्वी त्यानं पैसे घेतले होते, असा ही आरोप त्या व्यक्तीवर आहे.
2002 ते 2020 दरम्यान, आरोपीनं वैवाहिक वेबसाइट्सद्वारे काही महिलांशी मैत्री केली आणि त्यांच्याशी लग्न केले, असं डॅश यांनी सांगितलं. हा माणूस ओडिसामध्ये त्याच्या 14 व्या पत्नीसोबत राहत होता, जी दिल्लीत शाळेत शिक्षिका होती. त्या महिलेला त्याच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल कळाले त्यानंतर तिनं पोलिसांकडे तक्रार केली. ओडीशामधील त्याच्या भाड्याच्या घरातून त्याला अटक करण्यात आली. डीसीपी यांनी त्या व्यक्तीबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, घटस्फोटित महिलांना हा व्यक्तीला वेगवेगळ्या वेबसाइटच्या माध्यमातून लग्नाची मागणी घालत. त्यानंतर तो त्यांच्याकडून पैसे मिळवत होता.न तो डॉक्टर अशी ओळख सांगून तो, वकील, वैद्य आणि उच्चशिक्षित महिलांसोबत लग्न करत होता. पॅरा-मिलिटरी फोर्समध्ये काम करणारी एका महिलेसोबत देखील त्यानं लग्न केलं. त्याने दिल्ली, पंजाब, आसाम, झारखंड आणि ओडिशासह सात राज्यांतील महिलांची फसवणूक केली आहे. त्याच्या पहिल्या दोन बायका ओडिशामधील होत्या.
डीसीपी म्हणाले की, या व्यक्तीनं केलेल्या या 17 लग्नाबाबतची गोष्ट तेव्हा कळाली जेव्हा शाळेत शिक्षिका असणाऱ्या महिलेनं गेल्या वर्षी जुलैमध्ये महिला पोलिसांकडे तक्रार केली. तिनं सांगितलं की आरोपीने तिच्याशी 2018 मध्ये नवी दिल्लीत लग्न केले आणि तिला भुवनेश्वरला नेले. पोलिसांनी त्या व्यक्तीकडून11 एटीएम कार्ड, चार आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. हैद्राबाद आणि एर्नाकुलममध्ये बेरोजगार तरुणांची फसवणूक आणि कर्ज फसवणूक केल्याप्रकरणी त्याला यापूर्वी दोनदा अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या इतर बातम्या
- Hijab Controversy: हिजाब घातलेली महिला एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, हिजाबवरुन ओवेसी यांचे मोठं वक्तव्य
- Trending Video: हुंड्यात मिळणार होती चक्क ट्रेन, पण गड्यानं दिला नकार; कारण ऐकून पोटधरुन हसाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha