Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते. अभिनयानं आणि स्टाईलनं अमिताभ हे नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. पण अमिताभ हे बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे फॅन आहेत. त्या आभिनेत्रीबद्दल त्यांनी एका शोमध्ये सांगितलं होतं. 


एका रिअॅलिटी शोमध्ये अमिताभ यांनी सांगितलं की, त्यांची आवडती अभिनेत्री वहिदा रेहमान  या आहेत. त्यांनी सांगितले, 'वहिदा रेहमान यांच्यासोबत मला 'रेशमा और शेरा' या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या एका सिनचे शूटिंग सुरू असताना वहिदा आणि  सुनील दत्त यांना चप्पल न घालता रेतीवर बसायचे होते. चप्पल शिवाय रेतीवर उभे राहणे हे अशक्य होते. कारण रेती खूप गरम होती. मला वहिदा रेहमान यांची खूप काळजी वाटत होती. दिग्दर्शकानं जेव्हा कलाकारांना ब्रेक घेण्यास सांगितलं तेव्हा मी त्यांनी पायात शूज घालावेत म्हणून शूज घेऊन त्यांच्याकडे पळत गेलो. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. ' पुढे बिग बींनी सांगितलं, 'त्या खूप सुंदर आहेत. त्या फक्त चांगल्या अभिनेत्री नाही तर चांगल्या व्यक्ती देखील आहेत' 






. अमिताभ बच्चन यांचा झुंड हा चित्रपट चार मार्चला प्रदर्शित होणार आहे.  ब्रह्मास्त्र आणि  'द इंटर्न' या अमिताभ यांच्या आगामी चित्रपटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत.  ब्रह्मास्त्र  या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासोबत आलिया भट आणि रणबीर कपूर हे प्रमुभ भूमिकेत दिसणार आहेत. 


संबंधित इतर बातम्या


Rudra Trailer : प्रतीक्षा संपली, Ajay Devgn ची पहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर प्रदर्शित


Doctor Strange Trailer : ‘डॉक्टर स्ट्रेंज’मध्ये ‘आयर्न मॅन’ परतला! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका


Aaya Ye Jhund Hai Song : 'आया ये झुंड है...'; झुंडचं धमाकेदार गाणं रिलीज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha