Sanjay Raut Press Conferance : भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावं लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत. आम्ही खूप सहन केलं आहे. त्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. दरम्यान भाजपचे हे साडेतीन नेते कोण? हे आजच्या पत्रकार परिषदेत कळणार आहे. 


आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील. मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. 
 
संजय राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं होतं. 


संजय राऊत काय म्हणाले होते? 


आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, संजय राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. राऊतांनी सांगितलेले साडेतीन लोक कोण? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आज दुपारी सेनाभवनात होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे. अशातच आज शिवसेना नेमका कोणता बॉम्ब फोडणार? आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. 


नागरिकांसमोर वस्तुस्थिती मंडणायसाठी ही पत्रकार परिषद : अनिल देसाई


उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद आहे. त्या बैठकीत शिवसेना नेते , खासदार सगळे जमणार आहेत. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही. पण शिवसैनिक स्वतः उद्या जमतील. आम्ही कोणाला बोलवत नाही ,शिवसैनिक स्वतः येतील. ज्या घडामोडी सुरू आहेत , काय काय केलं जातंय , दबाव टाकला जातो, त्यावर उद्या बोलतील. उद्या कोण कोणाच्या रडारवर आहे ते कळेल. जनतेसमोर, सरकार समोर प्रत्येक नागरिकांसमोर वस्तुस्थिती मंडणायसाठी ही पत्रकार परिषद आहे, असे शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा