India's Got Talent :  छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट टॅलेंट (India's Got Talent) या शोला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी होतात आणि त्यांचे टॅलेंट सादर करतात. या शोची परीक्षक अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किरण खैर (Kirron Kher) या रॅपर बादशाहाला (Badshah) त्याच्या लेम्बोर्गिनी (Lamborghini) गाडीमुळे सुनावताना दिसत आहेत. 

Continues below advertisement


शिल्पाने किरण खैर यांना विचारलं, 'तुम्ही बादशाहाच्या कारबद्दल काय बोलू इच्छिता?' त्यावर किरण यांनी उत्तर दिलं, ' एवढी मोठी लेम्बोर्गिनी गाडी घेतली आहे बादशाहाने. त्याने गाडी पार्क केली आणि तो चावी घेऊन गेला. त्याच्या ड्रायव्हरला गाडी सुरू करता येत नव्हती. यशराज स्टूडिओच्या गेटपर्यंत गाड्यांची लाइन होती. त्याची गाडी पुढे देखील जात नव्हती म्हणून बाकी गाड्यांना देखील पुढे जाता येत नव्हते.' त्यावर बादशाहाने किरण कैर यांची माफी मागितली. 






शिल्पाने हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'इंडियाज गॉट टॅलेंट या शोचे  BTS ' शिल्पा इंडियाज गॉट टॅलेंट या शोच्या शूटिंगमध्ये होणाऱ्या मजा मस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. 


महत्त्वाच्या बातम्या :