Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही गेली अनेक वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तारक मेहता मालिकेमधील दया आणि जेठालाल या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. दया ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) साकारली होती. काही दिवसांपूर्वी दिशाने ही मालिका सोडली. या मालिकेच्या एका एपिसोडसाठी दिशा किती मानधन घेत असेल? किंवा दिशाकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमी पडत असेल. जणून घेऊयात दिशाबद्दल काही खास गोष्टी...


रिपोर्टनुसार दिशाने 2017 पर्यंत  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये काम केले. दिशाकडे जवळपास 37 कोटी रूपये संपत्ती आहे.  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मलिकेच्या एका एपिसोडसाठी दिशा  1-1.5 लाख रुपये मानधन घेत होती. ‘देवदास’, ‘मंगल पांडे', ‘जोधा अकबर’, ‘लव्ह स्टोरी 2050’  या चित्रपटांमध्ये दिशाने काम केले आहे. 


गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह यांनी काही दिवसांपूर्वी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सोनु भिडे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी देखाल मालिका सोडली. 


हे ही वाचा


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील 'या' एपिसोडचा व्हिडीओ व्हायरल; Youtube च्या टॉप 10 यादीत नाव


Dilip Joshi Net Worth : आलिशान घर ते लग्झरी गाड्या; अशी आहे तारक मेहतामधील जेठालालची लाईफस्टाईल