Kiran Mane on Nilesh Sable and Sharad Upadhye controversy : अभिनेते निलेश साबळे यांनी झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम वेळेचं नियोजन होत नसल्यामुळे सोडला. मात्र, निलेश साबळे यांनी सोडण्याचं कारण सांगण्यापूर्वीच त्यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी तर निलेश साबळे यांना गर्विष्ठ, अहंकारी म्हणत चुकीची वागणूक दिल्याचे आरोप देखील केले. शरद उपाध्येंच्या सर्व आरोपांना निलेश साबळे यांनी गुरुवारी सडेतोड उत्तर दिलं. दरम्यान, आता निलेश साबळे आणि शरद उपाध्येंच्या वादात अभिनेते किरण माने यांनी उडी घेतली आहे. किरण माने यांनी निलेश साबळेंच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. 

Continues below advertisement


किरण माने यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी 


निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे. 


‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची???  तुकोबाराया सांगून गेले आहेत,


"सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।।
 त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।।"


कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करीयरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक... आणि म्हण, "ए चल्... हवा येऊ दे"
खुप शुभेच्छा मित्रा.
- किरण माने.






इतर महत्त्वाच्या बातम्या 


गावाकडच्या मुलांची स्वप्नसुंदरी, राजेश्वरी खरातने पोल्का डॉट साडीत फोटो शेअर करताच कमेंट्सचा पाऊस


New Box Office Queen: बॉक्स ऑफिसची 'गोल्डन गर्ल', 6 महिन्यांत 3 फिल्म्स अन् कमाई 1000 कोटींची; टक्कर तर सोडा हिच्या आसपासही कुणी नाही