Rashmika Mandanna Three Movies Collected More Than Thousand Crore: यंदाच्या वर्षात अनेक सिनेमे (Bollywood Movies) आले, त्यातले काही सुपरहिट ठरले तर काही बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपटले. अनेक चित्रपट हिट ठरले नसले तरीसुद्धा कमाईच्या बाबतीत त्यांनी अनेक दिग्गजांच्या सिनेमांचे लाईफटाईम रेकॉर्ड मोडले. यावर्षीचा पहिला सुपरहिट सिनेमा कोणता असं जर तुम्हाला कुणी विचारलं तर, अगदी डोळे झाकून कुणीही उत्तर देईल की, विक्की कौशल स्टारर 'छावा'. या सिनेमानं यंदाच्या वर्षातला सुपरहिट सिनेमा दिला. पण, तसं पाहिलं तर  2024 चं वर्ष आणि 2025 मध्ये 'छावा' (Chhaava Movie) रिलीज होईपर्यंत बॉलिवूडला एकही हीट सिनेमा मिळालेला नाही. असं असलं तरीसुद्धा तुम्हाला माहितीय का? अशी एक अभिनेत्री आहे, जिनं फक्त 6 महिन्यांत आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर 3 असे हिट सिनेमे दिले आहेत. ज्यांनी तब्बल  800 कोटींची कमाई केली आहे. 

'या' अभिनेत्रीला म्हणतात बॉक्स ऑफिसची 'गोल्डन गर्ल' 

6 महिन्यांत 3 सुपरहिट सिनेमे देणारी सुपरस्टार अभिनेत्री म्हणजेच, 'गोल्डन गर्ल' रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna). अलिकडच्या काळात रश्मिका लकी चार्म आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, रश्मिका ज्या सिनेमात दिसते, तो सिनेमा थोडीथोडकी नाहीतर, थेट कोटींच्या घरात कमाई करतो. रश्मिकानं केलेले सिनेमेच पाहा ना, 'पुष्पा पार्ट-1' आणि 'पुष्पा पार्ट-2' किंवा मग 'अ‍ॅनिमल'. तेव्हापासून, अनेक निर्मात्यांची रश्मिका फेवरेट हिरोईन बनली आहे. 

2025 बद्दल बोलायचं झालं तर, रश्मिकाचा पहिला हिट सिनेमा 'छावा'. 'छावा'नं जगभरात बॉक्स ऑफिसवर सुमारे 807.88 कोटींची कमाई केली. 'छावा'नंतर रश्मिका मंदाना सलमान खानसोबत 'सिकंदर' मध्ये दिसली. भाईजान आणि रश्मिकाचा हा चित्रपट हिट झाला नसला तरीसुद्धा कमाई तशी तगडी केली. 'सिकंदर'नं वर्ल्डवाईड 177 कोटी कमावले.  त्यानंतर रश्मिका धनुषसाठी लकी चार्म ठरली. रश्मिकानं धनुषसोबत केलेल्या 'कुबेरा'नं फक्त 13 दिवसांत 83.55 कोटींची कमाई केली. आता जर रश्मिकाच्या या तिन्ही चित्रपटांचं कलेक्शन एकत्र केलं तर, अभिनेत्रीनं 6 महिन्यांत बॉक्स ऑफिसवर 1,068.43 कोटींची कमाई केली आहे. 

भल्याभल्या अभिनेत्रींना रश्मिकानं दिलीय टक्कर 

रश्मिकानं आपल्या दमदार अभिनयानं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. तिच्याव्यतिरिक्त इतर बॉक्स ऑफिसवर वाणी कपूर (रेड 2), सारा अली खान (स्काय फोर्स), जेनेलिया डिसूझा (सितारे जमीन पर), अनन्या पांडे (केसरी 2) आणि वामिका गब्बी (भूल चुक माफ) या सिनेमांचा समावेश आहे. तसं पाहायला गेलं तर या अभिनेत्रींच्या सिनेमांनी दमदार कमाई केली, पण त्यांचे प्रत्येक एक-एकच सिनेमे आले. रश्मिकानं मात्र एका मागून एक असे हिट सिनेमे दिले. म्हणूनच रश्मिकाला 'गोल्डन गर्ल' म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Abhishek Bachchan Breaks Silence On Divorce: 'मी पुन्हा लग्न करतोय...' ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं उत्तर, नेटकऱ्यांची बोलती बंद