Bhojpuri Actor Khesari Lal Yadav Crazy Fan Video : भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीझोतात येतो. खेसारी लाल कधी त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा हा भोजपुरी स्टार चर्चेत आला आहे. याचं कारण आहे, त्याची वेडी चाहती. ही चाहती भोजपुरी अभिनेता खेसारी लालच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. या चाहतीला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. खेसारी लालच्या क्रेझी फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली फॅन


भोजपुरी ट्रेंडिग स्टारची देशभरात मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. तो अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.या भोजपुरी सुपरस्टारच्या एका क्रेझी महिला चाहतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये, ती वेडी महिला चाहती खेसारीबद्दल बोलताना दिसत आहे आणि तिच्या हातात ट्रेंडिंग स्टारचा एक फोटो दिसत आहे. या फोटोमध्ये महिला चाहती खेसारी लालच्या बाजूला उभी असल्याचं दिसत आहे. या चाहतीने खेसारी लाल यादवसोबत लग्न करण्याची आणि त्याला किस करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.


"मला त्याची दुसरी बायको व्हायचंय..."


व्हायरल व्हिडीओमध्ये ही वेडी चाहती खेसारीबद्दल म्हणते की, 'जेव्हा तो मला भेटेल, तेव्हा मी त्याला किस करेन.' त्यानंतर या व्हिडीओमध्ये त्याच महिलेचा आणखी एक व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती साडीमध्ये दिसत आहे आणि म्हणते, 'मला फक्त खेसारी लालसोबत लग्न करायचं आहे. मला त्याची दुसरी पत्नी व्हायचे आहे.' व्हिडीओमध्ये महिला चाहती वारंवार म्हणते की, तिला फक्त खेसारीशीच लग्न करायचे आहे. हा खेसारी लाल यादवच्या वेड्या चाहत्याचा मीम व्हिडीओ आहे. महिला चाहत्याच्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर अनेक मीम्स बनवण्यात आले आहेत. हा सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंग विषय आहे.


"भेटल्यावर KISS करेन, गालाचा चावा घेईन"






खेसारीच्या क्रेझी फॅन टॅटू गर्लचा व्हिडीओ व्हायरल


याआधीही खेसारी लालच्या अनेक वेड्या चाहत्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्याच्या प्रसिद्ध चाहत्याच्या व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर, सुमारे दोन वर्षांपूर्वी, त्याच्या एका वेड्या फॅन टॅटू गर्लचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ट्रेंडिंग स्टारचा हा चाहता नेपाळचा होता, जो नेपाळी चित्रपट आणि स्टेज शो करायचा. त्याने स्वतःला खेसरीचा मोठा चाहता म्हणून वर्णन केले होते. शिवाय, त्या वेड्या चाहत्याने त्याच्या हातावर खेसारीचा टॅटू बनवून घेतला होता. हे खूपच व्हायरल झाले. खेसरीच्या त्या चाहत्याचे नाव सोम्या पोखरेल होते. आजही ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःशी संबंधित पोस्ट शेअर करत राहते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


लिपलॉक अन् 17 मिनिटांच्या इंटिमेट सीनमुळे खळबळ, अभिनेत्रीच्या वडिलांचा अभिनेत्याला फोन; एकता कपूरला मागावी लागली माफी...