Pushpa 2 Box Office Collection Day 39: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) हा चित्रपट सहाव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर (Box Office) उत्तम कमाई करत आहे. या चित्रपटानं आधीच कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम रचले आहेत, जे मोडण्यासाठी इंडस्ट्री उद्योगाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. हा चित्रपट आधीच देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. पण, रिलीज होऊन 39 दिवस उलटले तरिसुद्धा बॉक्स ऑफिसवरचा ताबा अजुनही पुष्पानं सोडलेला नाही. चित्रपट प्रदर्शित होऊन 39 दिवस उलटले आणि आतापर्यंत 1200 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्यानंतर, पुष्पा 2 आता 1250 कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहे.


पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शन


पुष्पा 2 नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपये आणि पाचव्या आठवड्यात 25.25 कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या मते, पुष्पा 2 नं सहाव्या आठवड्यात 37 व्या आणि 38 व्या दिवशी अनुक्रमे 1.15 कोटी आणि 2 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.


पुष्पा 2 च्या 39 व्या दिवशीच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत आणि आज सकाळी 10:35 वाजेपर्यंत चित्रपटाने 2.35 कोटी रुपये कमाई करून एकूण 1220.50 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 


पुष्पा 2 हा इंडस्ट्रीसाठी गेम चेंजर ठरला 


पुष्पा 2 नं ३६ व्या दिवशी सर्वात कमी 1.15 कोटी रुपयांची कमाई केली. या दिवशी गेम चेंजरनं 51 कोटींची कमाई केली आणि 37 व्या दिवशी पुष्पा 2 ची कमाई 73 टक्क्यांनी वाढली आणि चित्रपटानं 2 कोटींची कमाई केली. पण, गेम चेंजरची कमाई 57 टक्क्यांहून अधिक कमी झाली आणि या दिवशी त्याची कमाई फक्त 21.6 कोटी होती. 


नुकत्याच रिलीज झालेल्या फतेहबद्दल बोलायचं झालं तर, सोनू सूदच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी फक्त 2.4 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 2.1 कोटी रुपये कमावले. त्याच्या कमाईतही 12 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, तर पुष्पा 2 ला रिलीज होऊन 6 आठवडे उलटले आहेत, तरीही चित्रपटानं फतेहइतकीच कमाई केली आहे. म्हणजेच, गेल्या दोन दिवसांत पुष्पा 2 ची कमाई वाढली, तर गेम चेंजर आणि फतेहची कमाई कमी झाली आहे.


पुष्पा 2 ची स्टारकास्ट आणि बजेट


पुष्पा 2 हा चित्रपट सुमारे 500 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे आणि चित्रपटाची जगभरातील कमाई 1800 कोटींच्या पुढे गेली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, फहाद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.