एक्स्प्लोर

Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?

जब्या आणि परश्यानंतर खाशाबांच्या भूमिकेत नवा अभिनेता दिसणार आहे. त्यामुळे ही भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

Khashaba Movie Lead Role: मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार कथनशैलीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी भव्य कलाकृती घेऊन येत आहेत. ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’सारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांनंतर आता मंजुळे ‘खाशाबा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातून एका महाराष्ट्रातल्याच मातीतली कथा घेऊन आले आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज होताच अवघ्या 24 तासांत सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या टिझरमध्ये अनेक दिगजांची मांदियाळी आहे ,पण टिझर पाहिल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे 'खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारणार?' जब्या आणि परश्यानंतर खाशाबांच्या भूमिकेत नवा अभिनेता दिसणार आहे. त्यामुळे ही भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

खाशाबांच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याची निवड

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचं भव्य चित्रण, लाल मातीतील झुंज, संघर्षाची तीव्रता आणि सिनेमाचा मोठा आवाका प्रभावीपणे पाहायला मिळतो. कोल्हापूरच्या मातीत घडलेला आणि महाराष्ट्रासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

चित्रपटाची आणखी एक खास बाब म्हणजे खाशाबांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. कठोर ऑडिशन प्रक्रियेनंतर हा कलाकार निश्चित करण्यात आला असून त्याची घोषणा अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ‘जब्या’ आणि ‘परश्या’नंतर आता खाशाबा जाधवची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फॅन्ड्री आणि सैराट चित्रपटांमधून परशाची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर आणि जव्याची भूमिका साकारणारा सोमनाथ अवघडे दोघेही महाराष्ट्रात घराघरात पोहोचले . प्रचंड लोकप्रियता त्यांना मिळाली ..त्यामुळे नागराज मंजुळे आता खाशाबाच्या निमित्ताने कोणाला लॉन्च करणार याकडे साऱ्यांच्याच लक्ष आहे.

चित्रपटाला संगीताची साथ दिग्गज जोडी अजय अतुल यांनी दिली आहे. तर कलाकारांच्या फळीमध्ये जितेंद्र जोशी,महेश मांजरेकर,गिरीश कुलकर्णी,संदीप कुलकर्णी,वैभव मांगले,छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारखे दमदार कलाकार झळकणार आहेत. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी निर्मित आहे. ‘खाशाबा’ हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
Awarapan 2: 'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
'आवारापन 2'मधून इम्रान हाश्मीचा कमबॅक, 'धुरंधर - सिकंदर'चे मोडले रेकॉर्ड्स, Advance बुकींगमधून किती कमावले?
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget