KGF Chapter 2 : केजीएफ (KGF) चित्रपटामधील स्टार यशच्या (Yash) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. केजीएफ चॅप्टर 2 नं (KGF Chapter 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये यशनं रॉकी ही भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर रॉकी भाईची क्रेझ चाहत्यांमध्ये निर्माण झाली. या रॉकी भाई इफेक्सबाबत यशनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
यश म्हणाला, 'रॉकी भाईचा इफेक्ट हा प्रत्येकावर दिसत आहे. मला हे महत्त्वाचे वाटते की लोक माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. जर तुम्ही काही तरी चांगलं करत असाल तर लोक तुमचं कौतुक करतात. रॉकीचं देखील सगळ्यांनी कौतुक केलं. रॉकी ही माझ्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये देखील आहे. '
केजीएफमुळे माझ्यामधील आत्मविश्वास वाढला
यशनं सांगितलं, 'केजीएफ चित्रपटाच्या फ्रेंचाइजीसोबत मी आठ वर्ष जोडला गेलो आहे. मी आणि प्रशांत गेली आठ वर्ष एकमेकांसोबत काम करत आहोत. भूमिकेपेक्षा त्या व्यक्तीसाठी आम्ही एकत्र काम करतो. मी नाटकांमध्ये काम केलं आहे. आम्ही बॅकस्टेजमध्ये कपडे इस्त्री करण्याचं काम तसेच स्वच्छता करण्याचं काम करत होतो. आमचा उद्देश हा लोकांचं मनोरंजन करायचा होता. केजीएफ चित्रपटामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. '
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यशशिवाय यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी काम केले आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. केजीएफ चॅप्टर-2 हा 2018 च्या केजीएफचा सिक्वेल आहे.
लवकरच रिलीज होणार केजीएफ-3
गेल्या आठवड्यामध्ये निर्माते विजय किरगंदूर यांनी माहिती दिली की, केजीएफ चॅप्टर 3 हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणार असून हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होईल. ते म्हणाले, 'दिग्दर्शक प्रशांत नील सध्या सालारच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 30 ते 35 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याचे पुढील वेळापत्रक पुढील आठवड्यात सुरू होईल.'
हेही वाचा :