US Hypersonic ARRW Missile Test : हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची  यशस्वी चाचणी केल्याचा दावा अमेरिकेच्या हवाई दलाने केला आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने एक प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, अमेरिकन हवाई दलाच्या B-52H स्ट्रॅटोफोर्ट्रेसने 14 मे रोजी AGM-183A एअर-लाँच केलेले रॅपिड रिस्पॉन्स वेपन म्हणजे ARRW याची दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर यशस्वी चाचणी पार पडली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने सांगितले की, हे क्षेपणास्त्र विमानापासून वेगळं झाल्यानंतर म्हणजे क्षेपणास्त्राचा मारा केल्यानंतर ARRW का बूस्टर प्रज्वलित झालं. या क्षेपणास्त्राने ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक वेग प्राप्त केला.


उड्डाण चाचणी करणाऱ्या सैन्याचे (FLTS - Flight Test Squadron Military) 419 वे कमांडर लेफ्टनंट कर्नल मायकेल जंगक्विस्ट यांनी सांगितले की, 'अमेरिकेची हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली. आमच्या अत्यंत कुशल पथकाने या पहिल्या चाचणी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने इतिहास रचला. हे अद्यावत शस्त्र शक्य तितक्या लवकर सैन्य दलात सामील करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.'


ARRW क्षेपणास्त्रामध्ये काय आहे विशेष?
हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, ARRW क्षेपणास्त्राची रचना अमेरिकेला संवेदनशील वेळी जोखमीवर लक्ष्ये निश्चित करण्यासाठी करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र स्पर्धात्मक वातावरणात भेदक मारा करण्यात मदत करेल. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षाही पाचपट अधिक आहे.


या क्षेपणास्त्राचा पाठलाग करणं आणि रोखणं कठीण.
अमेरिका, चीन आणि रशिया हे हायपरसॉनिक शस्त्रांमध्ये आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक आहेत. या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वेग जास्त असल्याने त्यांचा पाठलाग करणं आणि त्याला रोखणं कठीण आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :