Horoscope Today, May 18, 2022: आज ज्येष्ठ नक्षत्र आहे. चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि सकाळी 08:13 नंतर धनु राशीत जाईल. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य आता वृषभ राशीत आहे. आज अनेक राशींना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. तर, काहींना नोकरीच्या नव्या संधी चालून येणार आहेत. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. जुन्या भांडणातून सुटका होईल. बर्याच संघर्षानंतर तुम्ही कुटुंबातही तुमचे स्थान निर्माण करू शकाल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. अचानक आर्थिक लाभ संभवतो. सावध राहा, रागावर नियंत्रण ठेवा. घरगुती कामात व्यस्त राहाल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ (Taurus Horoscope) : तुमचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे वाढेल. व्यवसाय चांगला होईल. नोकरीमध्ये दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. आत्मविश्वास कमी होईल. वाहन सुख मिळू शकेल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मित्रांसोबत प्रवास करण्याची योजना आखाल.
मिथुन (Gemini Horoscope) : अनावश्यक राग आणि वाद टाळा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. व्यवसायाची स्थिती चांगली राहील. उधार घेतलेले पैसे मिळू शकतात. जुन्या मित्राशी संवाद साधाल. मोकळा वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले ठरेल, अन्यथा तुमचे नुकसान होईल.
कर्क (Cancer Horoscope) : भावंडांसोबत सुरू असलेला वाद तुम्हाला सोडवावा लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. एखाद्या गोष्टीबद्दल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. संयमाने केलेल्या कामात यश मिळेल. घरात पाहुण्यांची ये-जा राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी.
सिंह (Leo Horoscope) : तुमचे उत्पन्न वाढेल. व्यवसायाची स्थिती ठीक राहील. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. जोडीदारासोबत संध्याकाळी फिरण्याची योजना बनवू शकता.
कन्या (Virgo Horoscope) : अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना प्रमोशन मिळेल. भौतिक सुख आणि संपत्ती वाढेल. मुलांचे सहकार्य मिळेल. स्वतःहून घरगुती वाद सुरू करू नका. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल.
तूळ (Libra Horoscope) : कामात व्यत्यय आल्याने तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जुने वाद मिटतील. नोकरीत प्रगती संभवते. या राशीच्या व्यावसायिकांनी पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी. भूतकाळातील चुकांमुळे तुम्हाला काळजी वाटेल. कुटुंबातील काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. नोकरीत तुमची प्रगती होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल. आज कोणत्याही मानसिक दडपणाखाली येऊ नका.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. मनःशांतीसाठी प्रयत्न करा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. संयमाचा अभाव राहील. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करू नका. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा कुटुंबात मतभेद होऊ शकतात. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला आहे.
धनु (Sagittarius Horoscope) : वाणीवर संयम ठेवा, जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वाहन चालवताना निष्काळजी राहू नका. दैनंदिन कामात काही बदल करू शकता. काही नवीन व्यावसायिक संपर्कांमुळे तुम्हाला फायदा होईल. एखाद्या प्रिय मित्राची भेट होईल. कामाचा ताण वाढू शकतो. काम जास्त होईल. मन अस्वस्थ होईल.
मकर (Capricorn Horoscope) : कामाच्या ठिकाणी जास्त धावपळ होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उच्च पद मिळू शकते. अनावश्यक खर्च जास्त होईल. कौटुंबिक समस्या वाढू शकतात. स्वभावात चिडचिडेपणा राहील. जास्त खर्चामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. या दिवशी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कार्यालयात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
कुंभ (Aquarius Horoscope) : कठोर परिश्रमाने यश मिळवू शकाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. आज केलेला प्रवास फलदायी ठरेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. मित्रांसोबत प्रवासाची योजना बनवू शकता. तुमचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे वाढेल. चांगली बातमी मिळेल. रखडलेले पैसे परत मिळतील. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो.
मीन (Pisces Horoscope) : अनावश्यक राग आणि वाद टाळा. व्यवसाय वाढीसाठी मित्राकडून सहकार्य मिळेल. अनियोजित खर्च वाढतील. संभाषणात संयम ठेवा. नोकरीत दुसऱ्या ठिकाणी संधी मिळू शकते. व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतात. रखडलेले पैसे परत मिळतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. ऑफिसमध्ये नवीन लोक भेटतील. आज तुमचे काही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :