KGF 2 : दाक्षिणात्य स्टार यशचा (yash) 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं भारतामध्ये 300 कोटींची कमाई केली आहे तर जगभरात तब्बल 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. केजीएफ-2 ला बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर आता दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माते तसेच होमेबल फिल्म्सचे (Hombale Films) फाउंडर विजय किर्गंदुर हे सध्या अभिनेता यशसोबत सेलिब्रेशन करत आहेत.
होमेबल फिल्म्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये यश, प्रशांत नील आणि विजय किर्गंदुर हे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. त्यांच्या समोर एक केक देखील ठेवलेला दिसत आहे. या केक वर केजीएफ-2 लिहिलेलं आहे. या फोटोला 'ही तर सुरूवात' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
14 एप्रिलला केजीएफ-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त , रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केजीएफ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Kshitij Date : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमात एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणार क्षितिज दाते