Shilpa Shinde : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या (Shilpa Shinde) भाभी जी घर पर है (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोमध्ये ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारून शिल्पाने खूप लोकप्रियता मिळवली. एका मुलाखतीमध्ये शिल्पानं या मालिकेबाबत सांगितलं. 2017 मध्ये शिल्पानं मालिकेच्या मेकर्ससोबत झालेल्या मतभेदांमुळे सोडायचा निर्णय घेतला. मालिका सोडल्यानंतर काम मिळालं नाही, असं एका मुलाखतीमध्ये शिल्पानं सांगितलं. 


शिल्पानं मुलाखतीमध्ये सांगितले, 'छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे पैसा आणि प्रसिद्धी मिळते. लोकांना असे वाटते की मला मालिकेमध्ये काम करायचे नाही. त्यामुळे भाभी जी घर पर है सोडल्यावर मला काम मिळालं नाही. मी डिजीटल प्लॅटफॉर्ममधील शोमध्ये काम केले. दोन वेब शो देखील केले. भाभी जी घर पर है हा माझा कम बॅक शो होता आणि ज्यामध्ये मला उभे राहून फक्त एक्सप्रेशन द्यावे लागतील अशा शोमध्ये मला नंतर काम करायचे नव्हते  '


'भाभी जी घर पर है मालिकेनंतर मला काही तरी चांगले काम करायचे होते. चित्रपटांमध्ये, टिव्ही शोमध्ये मला काम करायचे होते. मला दोन लेव्हल खाली जायचे नव्हते. माझ्याबाबत अनेक लोक असं म्हणतं होते की मी सेटवर नखरे दाखवत होते. मला एटीट्यूड आहे असंही काही लोक म्हणत होते. जर कोणती गोष्ट मला आवडली नाही तर त्याबद्दल मी लगेच बोलते.', असंही शिल्पानं सांगितलं. शिल्पाला बिग बॉसच्या 11 व्या सिझनमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 


महत्वाच्या बातम्या :